LIVE : मुंबईकरांनो घरी लवकर पोहोचा, पुढील तीन तासात शहरात अतिवृष्टीचा इशारा

   

LIVE : मुंबईकरांनो घरी लवकर पोहोचा, पुढील तीन तासात शहरात अतिवृष्टीचा इशारा
Picture

मुंबईत पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा, वेधशाळेने अंदाज वर्तवला

26/09/2019,5:57PM
Picture

बीड: गोदावरी नदीला पूर, गेवराई परिसरातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा

26/09/2019,11:22AM
Picture

जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटांनी उघडले

जायकवाडी धरणातील विसर्ग वाढला,धरणाचे 16 दरवाजे दोन फुटांनी उघडले, 35100 क्युसेकने नदीपात्रात विसर्ग, दुपारपर्यंत विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना तर्कतेचे आवाहन

26/09/2019,11:10AM
Picture

मनमाड : गिरणा धरणातून 15000 क्यूसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग

मनमाड : गिरणा धरणातून 15000 क्यूसेकने पाण्याचा नदीपात्रा विसर्ग, नदीकाठच्या गावांना आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश

26/09/2019,11:09AM
Picture

बारामतीतील 224 कुटुंब आणि 602 जनावरांचं स्थलांतर

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील बारामतीत दाखल बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील 224 कुटुंब आणि 602 जनावरांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर, आंबी बुद्रुक, मोरगाव, तरडोली, जळगाव सुपे, अंजनगाव, करावागज, डोर्लेवाडी, सोनगाव या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले जेजुरी – सासवड मार्गावरील पूल तुटला, पुण्याहून जेजुरीकडे जाणारी वाहतूक थांबवली, जेजुरी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं

26/09/2019,11:08AM
Picture

बारामतीकरांनो घाबरु नका - जिल्हाधिकारी

बारामती : नागरीकांनी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाही. पुण्यातील परिस्थिती पावसामुळे, तर बारामतीत नाझरे धरणातील पाणीसाठा वाढल्याने पूरस्थिती. सुरक्षिततेसाठी सर्व त्या उपाययोजना केल्या आहेत. कोणतीही दुर्घटना किंवा जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्षता घेतली जातेय. पुढील एक दोन तासात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

26/09/2019,11:08AM

 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *