AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खं गाव सुन्न… आईसह चार मुलांना विषबाधा, 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हादरला

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

अख्खं गाव सुन्न... आईसह चार मुलांना विषबाधा, 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हादरला
food poisoningImage Credit source: Google
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Apr 06, 2026 | 10:26 PM
Share

बुलढाणा जिल्ह्यात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. धाड येथे आज घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेच तीन लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला आहे. सध्या आई व एक चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण धाड परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विषबाधा झाल्यामुळे 3 चिमुकल्यांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार धाड येथील अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय 34) यांच्यासह त्यांच्या 4 मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेत मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय 4), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय 7) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय 8) या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आई अफरीन आणि मुलगी अश्मिरा वसीम जमदार (वय 3 ) यांच्यावर बुलढाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्वजन या दोघींच्या प्रकृतीत सुधारणेची प्रार्थना करत आहेत.

कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास

रविवारपासून या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. आज सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अली व मशिरा यांचा मृत्यू झाला. आई अफरीन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, फातिमा व अश्मिरावर बालरोगतज्ज्ञांकडे उपचार करण्यात येत होते. सायंकाळी सुमारास फातिमा हिचाही मृत्यू झाला.

अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय

सध्या अश्मिराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अन्न-पाणी किंवा इतर पदार्थांमधून या कुटुंबाला विषबाधा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी डॉक्टरांकडून शिळे आणि उघड्यावरचे अन्न खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप