Buldana Accident | शेतात काम करताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकला, बुलडाण्यात 35 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

ट्रॅक्टरला रोटाव्हेटर ही मशीन लावली होती. पण, काम करत असताना त्यांचा तोल गेला. ते रोटाव्हेटरमध्य अडकले. त्यामुळं मशीनमध्ये अडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. रक्तबंबाळ झाले. बाजूला काम करणाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत तितरे यांचा मृत्यू झाला होता.

Buldana Accident | शेतात काम करताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकला, बुलडाण्यात 35 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
याच ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटर मशीनखाली दबून तितरे यांचा मृत्यू झाला. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 9:33 AM

बुलडाणा : ट्रॅक्टरने शेतीची मशागत करीत असताना रोटावेटरमध्ये अडकून 35 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नांदुरा (Nandura) तालुक्यातील टाकळी वतपाळ शेतशिवारात घडली. हिंगणे गव्हाड (Hingane Gawhad) येथील शत्रुघ्न समाधान तितरे (वय 35 वर्षे) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी शत्रुघ्न समाधान तितरे ( Shatrughan Titre) हे टाकळी वासुदेव जमाव यांच्या शेतात रोटाव्हेटरने शेतीची मशागत करीत होते. अचानक रोटावेटरमध्ये अडकले. त्यात गुंडाळून त्याचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच सर्व गावकरी मदतीसाठी घटनास्थळी गर्दी केलीय. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय. या घटनेमुळं ट्रॅक्टर चालविणाऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ट्रॅक्टर चालविताना सावधगिरी बागळणे गरजेचे आहे.

नेमकं काय घडलं

तितरे हे शेतात काम करत होते. ट्रॅक्टर चालवत होते. ट्रॅक्टरला रोटाव्हेटर ही मशीन लावली होती. पण, काम करत असताना त्यांचा तोल गेला. ते रोटाव्हेटरमध्य अडकले. त्यामुळं मशीनमध्ये अडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. रक्तबंबाळ झाले. बाजूला काम करणाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत तितरे यांचा मृत्यू झाला होता. तितरे हे कुटुंबाचा आधार होते. पण, त्यांच्या मृत्यूनं कुटुंबीयांचा आधार हरविला आहे. एक तरुण काम करत असताना गेल्याचं दुःख आहे.

शेतीच्या कामाला वेग

पाऊस पडल्यानं जिल्ह्यात शेतकरी कामाला लागले आहेत. शेतीसाठी यंत्रांचा वापर केला जातो. ट्रॅक्टरला रोटाव्हेटर ही मशीन लावून ते शेतात काम करत होते. आजूबाजूलाही शेतीची कामं सुरू होती. मशीनचा वापर करून कामं सोपी व्हायला लागली आहेत. पण, मशीन योग्य पद्धतीनं हाताळली नाही. तर असे अपघात होतात. अचानक झालेली एक चूक खूप महागात पडते. अशीच चूक तितरे यांच्याकडून झाली. त्यामुळं ते रोटाव्हेटर मशीनमध्ये अडकले. त्यामुळं त्यांचं कुटुंबीय उघड्यावर आले आहे. गावात तरुणाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.