Shweta Mahale : भाजप आमदार श्वेता महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल, विनापरवानगी मोटारसायकल रँली काढल्याप्रकरणी कारवाई

शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने काल 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त चिखली शहरांमधून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. आमदार श्वेता महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांसह सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Shweta Mahale : भाजप आमदार श्वेता महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल, विनापरवानगी मोटारसायकल रँली काढल्याप्रकरणी कारवाई
भाजप आमदार श्वेता महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 6:57 PM

बुलढाणा : शिवजयंती निमित्त चिखली शहरातून शनिवारी महिलांची भव्य मोटारसायकल रॅली (Bike Rally) काढण्यात आली होती. परंतु या रॅलीच्या माध्यमातून साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि विनापरवानगी रॅली काढली म्हणून भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे 30 ते 35 जणांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale), जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योती खेडेकर, माजी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, माजी नगरसेविका संगिता गाडेकर, मीनल गावंडे, नेहा खरात, तेल्हारा ग्राम पंचायत सरपंच किरण गाडेकर, विजया खडसन, सुरेखा पडघान, मनीषा सपकाळ यांच्यासह अनिकेत सावजी, अमोल खेडेकर यांच्यासह इतर 30 ते 35 स्कूटी चालक महिलांचा समावेश आहे. (BJP MLA Shweta Mahalen and many others have been charged, Action taken in case of unauthorized motorcycle rally)

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने काल 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त चिखली शहरांमधून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. आमदार श्वेता महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांसह सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मात्र कोरोना प्रोटोकॉलचा आधार घेत चिखली पोलिसांनी या रॅलीला परवानगी नसल्याचे कारण सांगून रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनापरवानगी मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेशाचे व महाराष्ट्र शासनाचे कोव्हीड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधितांवर पोलिसांनी लावला आहे. या सर्वांवर कलम 188, 269, 270 आयपीसी यासह कलम 3 साथरोग प्रतिबंधक अधिनियम, 135 अंतर्गत ही कारवाई चिखली पोलिसांनी केली आहे.

कल्याणमध्ये शिवजयंती रॅली दरम्यान तलवारी नाचविल्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी राज्यभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या मोहने परिसरात शिवजयंतीनिमित्त काही तरुणांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिसांनी सुरू केला आहे. या व्हिडिओच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू करत या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जयदीप पाटील आणि हर्षद भंडारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. (BJP MLA Shweta Mahalen and many others have been charged, Action taken in case of unauthorized motorcycle rally)

इतर बातम्या

Property Tax : उल्हासनगरात मालमत्ता कराचे 193 चेक बाऊन्स, महापालिकेकडून थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

टिटवाळ्यावरुन वाशीला जीव द्यायला आला! नोकरी नसल्यानं पुलावरुन उडीही टाकली आणि…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.