Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2024 ला बुलडाण्याचा खासदार भाजपचाच, खासदार प्रतापराव जाधवांची पंचाईत होणार?

2024 चा आपल्याला भाजपच्या कमळावरचा खासदार जिंकून आणायचा आहे. मोदींना आपल्याला भाजपचा खासदार बुलडाण्याचा असेल हे दाखवायचा आहे.

Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2024 ला बुलडाण्याचा खासदार भाजपचाच, खासदार प्रतापराव जाधवांची पंचाईत होणार?
खासदार प्रतापराव जाधवांची पंचाईत होणार?
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 2:56 PM

बुलडाणा : भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर बावनकुळे हे काल सायंकाळी बुलडाणा शहरात आले होते. त्यांनी भाजपची जिल्हा बैठक (BJP District Meeting) घेतली. यावेळी बावनकुळे यांनी 2024 चा बुलडाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणा केली. यामुळे नुकतेच शिंदे गटात गेलेले आणि बुलडाणा जिल्ह्याचे खासदार (MP of Buldana) प्रतापराव जाधव यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. भाजपने मिशन बुलडाणा लोकसभा चांगलेच मनावर घेतले. त्यामुळं 2024 मध्ये आपण भाजप-शिंदे सेना युतीचे उमेदवार राहू. या खासदार जाधवांच्या आशेवर पाणी फेरले जाणार असल्याची शक्यता आहे.

बुलडाण्यात होणार भूपेंद्र यादव यांचा प्रवास

बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत. जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असून शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक असे आमदार आहेत. भाजप शिंदे गटाचा विचार केला तर पाच आमदार त्यांच्याकडे आहेत. मात्र जिल्ह्यात लवकरच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलडाणा लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले. त्याची पूर्वतयारी म्हणून बावनकुळे हे जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळे यांनी 2024 ला बुलडाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच झाले पाहिजे. त्यासाठी भूपेंद्र यादव यांचा प्रवास होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. बावनकुळे यांच्या बुलडाणा लोकसभेच्या घोषणेमुळे भाजप कार्यकर्त्यामध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण आहे.

शिंदे – फडणवीस सरकार 100 च्या स्पीडने

2024 चा आपल्याला भाजपच्या कमळावरचा खासदार जिंकून आणायचा आहे. मोदींना आपल्याला भाजपचा खासदार बुलडाण्याचा असेल हे दाखवायचा आहे. पुढील काळात मुख्यमंत्री कोणाचा होईल हे सांगता येणार नाही. आणि शिंदे – फडणवीस सरकार 100 च्या स्पीडने सरकार चालवत आहेत. मागील सरकारचा हा तीन चाकी ऑटो होता. त्याला धक्का मारून चालवायचे. मात्र ही गाडी बुलेट ट्रेनसारखी चालत असल्याचा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.