मोठी बातमी! राजू शेट्टी यांचा जवळचा माणूस, स्वाभिमानीचा बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण स्वाभिमानीचा एक तरुण तडफदार नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहे, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते एकनाथ खडसे यांनी या तरुण नेत्याची बुलढाण्यात जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! राजू शेट्टी यांचा जवळचा माणूस, स्वाभिमानीचा बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 8:35 PM

बुलढाणा : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाहीय. विशेष म्हणजे आज बुलढाण्यात राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडल्याची माहिती मिळत आहे. बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तरुण नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बुलढाण्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे आज बुलढाणा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. या दरम्यान त्यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी रविकांत तुपकर आणि एकनाथ खडसे यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा बुलढाण्यात रंगू लागली आहे. यावर रविकांत तुपकर यांना विचारलं असता त्यांनी सध्या काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा

एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समोर येणं महत्त्वाचं आहे. दरम्यान स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आणि स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यात गेल्या वर्षभरापासून मतभेद असल्याच्या रंगल्या होत्या. त्यामुळे रविकांत तुपकर हे नाराज असल्याचे अनेकदा समोर आलेलं आहे. या कारणामुळे रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.

रविकांत तुपकर नेमके कोण आहेत?

रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तडफदार नेते आहेत. त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी शेतकरी चळवळीत कामाला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यांना 2015 साली राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला होता. कारण त्यांना महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. पण सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप करत त्यांनी 2017 साली आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

रविकांत तुपकर हे स्वाभिमानीचे तरुण तडफदार नेते आहेत. राज्यातील हजारो कार्यकर्ते त्यांच्या भाषणाने प्रभावित होतात. त्यांचं काम आणि भाषणाने अनेकजण प्रभावित होतात. रविकांत तुपकर हे वारंवार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. शेतीच्या भावाला हमीभाव मिळावा यासाठी ते प्रयत्न करतात. त्यामुळे ते हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत.

हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.