‘या’ तीन प्रकरणांमुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अडचणीत, काय कारवाई होणार?

बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटात गेलेले दोन आमदार आणि एक खासदार यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यात डॅशिंग आणि फायरब्रँड आमदार संजय गायकवाड हे वादग्रस्त भूमिकेत अग्रेसर ठरत असल्याचं दिसून आलं आहे.

'या' तीन प्रकरणांमुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अडचणीत, काय कारवाई होणार?
शिवसेना आमदार संजय गायकवाड
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 6:02 PM

गणेश सोळंकी, Tv9 प्रतिनिधी, बुलढाणा | 2 मार्च 2024 : एका महिलेची शेतजमीन हडपून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने 17 फेब्रुवारीला बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड आणि आणखी दोघंविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र बोराखेडी पोलीस प्रशासनाने आमदाराच्या दबावात गुन्हा दाखल करण्यास चालढकल केल्याचा आरोप करण्यात येतोय. या मुद्द्यावरुन वातावरण तापत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अखेर 28 फेब्रुवारीला रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. दुसरीकडे आपल्या गळ्यातील हारात वाघाचा दात असल्याचा दावा आणि ती शिकार आपण स्वतः केल्याचा दावा करणारे आमदार संजय गायकवाडांवर वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आमदार वाघाचा दातसदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेत डेहराडून येथील ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट’मध्ये डीएनए तपासणीसाठी पाठवली आहे. या प्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.

शेतजमिनीचं प्रकरण नेमकं काय?

बुलढाणा मतदारसंघात येणाऱ्या मोताळा शेत शिवारातील आपण देत असलेल्या भावात शेतजमीन आपल्या नावावर करून द्यावी लागेल, असा तगादा आणि सदर जमिनीवर अतिक्रमण करून फार्म हाऊस बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय राहणार नागपूर, असे या तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात त्यांची दीड एकर शेती आहे. आमदार गायकवाड यांनी 21 जुलै 2021 ला त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले. आणि दबंगगिरीच्या जोरावर उपाध्याय यांच्या शेतजमिनीवरची कुंपणे त्यांनी काढून फेकली. तेथे त्यांनी अवैधरीत्या फार्म हाऊस बांधले. त्यांच्या शेतजमिनीत उत्खनन केले. त्यातून मुरूम काढला. याचिकाकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला, तेव्हा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यासह काही जणांविरोधात ऑगस्ट 2021 रोजी बोरखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी मोताळा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने प्रकरणाची बाजू तपासून फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या अनु.156 (3) नुसार कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कलम 143, 150, 379, 385, 447 आणि 34 अन्वये कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी 17 फेब्रुवारीला दिले आहेत.

अखेर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

मात्र न्यायालयाच्या आदेशाचा कुठला फरक बोराखेडी पोलिसांवर पडलेला दिसत नव्हता. कारण आदेश देऊन 10 दिवसांचा अवधी झालेला असतांना सुद्धा यामध्ये कारवाई झालेली नाही. याबाबत तक्रारकर्त्या महिलेने पोलिसांशी संपर्क साधून कारवाईची विंनती केली. मात्र पोलीस बंदोबस्तात व्यस्त आहेत. नंतर बघू असे सांगण्यात आले. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याने आपण पोलिसांविरोधात न्यायालयात गुरुवारी दाद मागणार असल्याचे रिटा उपाध्याय यांनी सांगितले होते. याबाबतची भनक लागताच बोराखेडी पोलीस कामाला लागले. तेथील ठाणेदार या संदर्भात काल बुलढाण्यात जाऊन आले आणि रात्री उशिरा अप क्र. 105/2024 कलम 143,150,379,385, 447.34 नुसार संजय गायकवाड, मृत्युंजय संजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे, ज्ञानेश्वर वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर संजय गायकवाड चर्चेत

आता पुन्हा एक व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यात नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंतीच्या भाव्य शोभायात्रेत नाचण्यावरून राडा झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. त्यात आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या हातातील लाठी घेऊन एकास दोन्ही हाताने ताकतीने मारहान करीत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. यात कुठलीही तक्रार पोलीसात नसल्याने अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. मात्र सोशल माध्यमात हा व्हिडीओ वायरल झाल्याने प्रशासन काय कारवाई करतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. अशा तीन घटना आमदार संजय गायकवाड यांच्यात बाबतीत घडल्याने ते वादग्रस्त ठरत असल्याचे दिसून येत आहे..

संजय गायकवाड यांचं पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण

आमदार संजय गायकवाड यांनी या तिन्ही प्रकरणात आज पत्रकार परिषद घेऊन तीनही विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. संजय गायकवाड यांच्या गळ्यातील वाघाचा दात वनविभागाने जप्त करून त्याची तपासणी केली आहे. त्यामुळे संजय गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातला की नाही हे वन विभागाच्या चौकशीअंती स्पष्ट होईल, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

शिवजयंती दरम्यान एका युवकाला काठीने बेदमपणे मारहाण करताना संजय गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी त्या युवकाने एका मुलीची छेड काढली असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे त्या युवकाला मी स्वतः चोप दिला असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. संजय गायकवाड यांनी त्या मुलीचा बलात्कार होण्याची वाट पाहायची होती का? असा सवाल देखील केला आहे.

यासोबतच संजय गायकवाड यांच्यावर एका महिलेची दीड एकर शेती हडपल्याचा आरोप देखील झालाय. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यासह काही लोकांवर या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झालेत. यावर देखील संजय गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणाची माझा काही एक संबंध नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.