‘तुमचे हातपाय कलम करू’; सहकार मंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर तीव्र पडसाद, बाबासाहेब पाटील यांना कुणी दिली धमकी?
Cooperative Minister Babasaheb Patil : लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असे वक्तव्य करून काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वाद ओढावून घेतला. त्यावर शेतकरी, शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते संतप्त झाले आहेत. त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे.

Farmer Loan Waiver : लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल चोपडा तालुक्यात केले होते. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात संतापाची लाट उसळली. अतिवृष्टी, महापूराने शेतकरी बेजार झाला आहे. त्याच्या हातातोंडाचा घास निसर्गाने हिसकावला आहे. त्यातच सरकार देत असलेली मदतही तुटपूंजी असल्याची ओरड आहे. अजून तर केंद्र सरकारच्या मदतीची प्रतिक्षा आहे. त्यात असे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच ठरले. राज्यभरातून या वक्तव्यावर तीव्र संताप दिसून आला. बुलडाण्यातील एका नेत्याने तर त्यांच्यावर आगपाखड केली नाहीतर त्यांचे हातपाय कलम करण्याची धमकी दिली.
तुमचे हातपाय कलम करू
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तुमच्यात जर हिंमत असेल तर विदर्भात पाय ठेऊन दाखवा. नांगराच्या फाळाचे तलवारी करून तुमचे हात पाय कलम केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डीक्कर यांनी दिली. पाटील यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्याचे समोर येत आहे. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेतकऱ्यांच्या नांगराच्या फाळीच्या तलवारी करून बाबासाहेब पाटील यांचे हात पाय कलम करणार असल्याची धमकी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नांद लागलाय , या केलेल्या वक्तव्यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना ही धमकी देण्यात आली. एव्हढेच नव्हे तर त्यांनी बेताल वक्तव्य केले, शेतकरी मेटाकुटीस आला असताना शेतकऱ्यांचा अपमान करणे चुकीचे असून बाबासाहेब पाटील यांना खुले आव्हानं देण्यात आले आहे.
पाटील यांचे वादग्रस्त विधान
लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे , कर्जमाफी वरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी असं वादग्रस्त विधान केलं आहे. आम्हाला निवडून यायचे आहे त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो, असा दावा त्यांनी काल केला. “निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केल्यास निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिले जाते.” असं सहकार मंत्री म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा तालुक्यात घोडगाव येथे पीपल्स बँकेच्या शाखेच्या उद्घाटनावेळी त्यांनी असे वादग्रस्त विधान केले. पण नंतर वातावरण तापल्याचे लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण हे प्रकरण शांत झालेले नाही. पाटील यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटत आहे.
