AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना खासदाराचे नाव घेऊन महिलेचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने शिवसेना खासदाराचे नाव घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. संबंधित खासदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत. या व्हिडिओमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना खासदाराने स्वत:वरील आरोप फेटाळून लावले आहेत.

शिवसेना खासदाराचे नाव घेऊन महिलेचा जीवन संपवण्याचा प्रयत्न
Prataprao Jadhav
| Updated on: Mar 13, 2024 | 7:57 AM
Share

बुलढाणा (गणेश सोलंकी) : शिवसेना खासदाराचे नाव घेऊन एका महिलेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव या महिलेने व्हिडिओमध्ये घेतलं आहे. जानेफळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच नावही महिलेने व्हिडिओमध्ये घेतलं आहे. ठाणेदार कारवाई करत नसल्याचा व्हिडिओमध्ये आरोप करण्यात आला आहे.

आरोप करणारी महिला काल सकाळपासून गायब असून जानेफळ पोलिस महिलेचा शोध घेत आहेत. व्हिडिओमध्ये महिलेने तिचं नाव सरस्वती राठोड सांगितलं आहे. सदर महिला मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील राहणारी आहे. बाहेरगावच्या काही लोकांनी घर तोडून साहित्य चोरुन नेले, अशी तक्रार महिलेने केली. मात्र पोलीस आणि खासदार जाधव यांनी न्याय दिला नाही. उलट खासदार जाधव यांनी आपला अपमान केल्याचं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

सरपंच ते खासदार असा त्यांचा प्रवास

महिलेने केलेले आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी फेटाळून लावले आहेत. प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. सरपंच ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 1995 ते 2009 ते आमदार होते. शिवसेना-भाजपा युती सरकारच्या पहिल्याकाळात ते राज्यमंत्री सुद्धा होते. 2009 पासून ते खासदार आहेत. सध्या त्यांची खासदारकीची तिसरी टर्म आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.