AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाबाबत सर्वात मोठा निर्णय! वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार!

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय! वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार!

मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाबाबत सर्वात मोठा निर्णय! वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार!
drought taluka list and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 3:06 PM
Share

Maharashtra Cabinet Meeting Decision Today : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. यासह वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांचीही या बैठकीत उपस्थिती होती. दरम्यान, आजच्या बैठकीत दुष्काळ निवारण तसेच शेतकरी मदत यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर काही तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळले होते. याच वगळलेल्या तालुक्यांबाबत आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आालाय. या निर्णयामुळे आता हजारो शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती बैठक नियमित घ्याय मंत्र्यांनी आपल्या सूचना नियमितपणे या उपसमितीकडे द्याव्यात, असे फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. तसेच जे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झालेले नाहीत, त्याबाबत अन्य निकष लावून मदतीबाबत प्रस्ताव सादर करावा असा महत्त्वाचा आदेश फडणवीस यांनी दिला.

पाणीवापरासाठी स्पष्ट जिआर काढा

दुष्काळाच्या या काळात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो. पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. म्हणूनच पाणीवापर कसा करायचा याचा स्वयंस्पष्ट GR काढा, पिण्याचे पाणी गृहीत धरताना त्यात जनावरांचे पाणी समाविष्ट करा आणि नंतर इतर प्राधान्यक्रम ठरवा, असाही आदेश फडणवीस यांनी दिला.

परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका

डीपीडीसीमध्ये अधिकाधिक कामे ही दुष्काळ निवारणाची घ्या. पालकमंत्र्यांनी कल्पकतेने स्थानिक स्तरावर काय निर्णय घेता येईल, यावर लक्ष द्यावे, अशा सूचना फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना केल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका, असा महत्त्वाचा आदेश फडणवीस यांनी दिलाय. फडणवीस यांच्या या आदेशामुळे आता विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

या तालुक्यांना वगळले होते, परंतु आता…

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळलेल्या काही तालुक्यांना आता फडणवीस यांच्या या निर्णयामुळे दिलासा मिळू शकतो. या तालुक्यांतही पाऊस कमी झालेला आहे. परंतु निकष पूर्ण न केल्याने या तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्य मार्गाने मदत केली जाणार आहे. ही मदत कशी असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आगामी काही दिवसात अधिक स्पष्टता येईल.

Follow Us
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण