AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! २५ टक्के अग्नीविरांचा पोलीस दलात समावेश करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Agniveers in Maharashtra Police: अग्नीविरांसाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता दिलासा मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! २५ टक्के अग्नीविरांचा पोलीस दलात समावेश करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
| Updated on: Sep 29, 2026 | 3:30 PM
Share

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी मोठी घोषणा केली आहे. २५ टक्के अग्नीविरांना पोलीस दलात समावून घेणार असल्याचे ते म्हणाले आहेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील दुष्काळासंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुष्काळाच्या संदर्भात काही मंत्र्‍यांनी त्यांच्या विभागातील तालुक्यांत पीक करपले तरी निकषांत बसलेले नाहीत. त्यांनाही मदत करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात अशा तालुक्यात ट्रिगर २ मधील काही निकष आणि त्या ही निकषात ते बसत नसतील, तरी त्यांना दुष्काळाचा सर्व फायदे द्यायचे, अशी कार्यप्रणाली आज ठरलेली आहे. याची देखरेख उपसमिती करणार आहे. यामुळे कोणत्या तालुक्यावर किंवा शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय देता येईल. आम्ही फक्त तालुकेच नाही तर मंडळ स्थरावर देखील जाण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, आज पहिली अग्नीविरांची बॅच ही त्यांचा कार्यकाळ संपवून परत येणार आहेत. त्या बॅचमधील २५ टक्के अग्नीवीर हे सेनेतच राहतील. तसेच ७५ टक्के अग्निवीर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध फोर्समध्ये घेतले गेले पाहिजेत. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की, यातील २५ टक्के अग्निवीर पोलीस दलात समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी कोणतीही परीक्षा अथवा ट्रेनिंगची अट असणार नाही. त्यांना वयात चार वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

फडणवीस म्हणाले की, ते फायरमन म्हणून गेले तर त्यांनी तीन महिन्याचं ट्रेनिंग एका वर्षात घ्यावे. असं बंधन आपण त्यांच्यावर टाकणार आहोत.तसेच कुठे पदे कमी पडली तर त्याठिकाणी जास्त पदे करण्याचे ठरवले आहे. जितक्या अग्नीविरांना शासनामध्ये यायचे आहे, त्या सर्वांना आपण सामावून घेणार आहोत. नेव्हीमधून जे येणार आहेत त्यांची कोस्टल सिक्युरिटीमध्ये गरज आहे. त्यामुळे पदांची शिथिलता करून त्यांचा समावेश करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपण १० टक्क्याचं आरक्षण अग्निविरांना दिले आहे. माजी सैनिक कॅटेगिरीतही त्यांना सूट मिळणार आहे. तेथील पदांमध्ये अग्निविरांना आपण प्राधान्य देणार आहोत. महाराष्ट्रातील अग्निवीर जे परत येतील त्यातील ज्यांची शासनात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्य शासन घेईल. सगळ्या अग्नीविरांना आम्ही राज्य शासनात समाविष्ट करू, असं आश्वासन देवेंद्र फडणविसांनी दिले आहे.

Follow Us
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर  मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन