Viral Video | भारताच्या नकाशाच्या आकाराचा केक, त्यावर छोटा राजनचा फोटो, भाईचा बड्डे म्हणत समर्थकांकडून जल्लोष

चेतन पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 13, 2021 | 6:11 PM

छोट्या राजनच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे (Cake cutting by Chhota Rajan supporters)

Viral Video | भारताच्या नकाशाच्या आकाराचा केक, त्यावर छोटा राजनचा फोटो, भाईचा बड्डे म्हणत समर्थकांकडून जल्लोष

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा 5 डिसेंबरला वाढदिवस असतो. मात्र त्याचे काही समर्थक आहेत जे 13 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करतात. छोट्या राजनच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत केक हा भारताच्या नकाशाच्या आकाराचा तयार करण्यात आल्याचं दिसत आहे. त्यावर छोटा राजनचा फोटो आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दीपक सपके आणि त्याचे काही साथीदार केक कापताना दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील ‘भाईचा बड्डे’ हे गाणं वाजत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे (Cake cutting by Chhota Rajan supporters).

दरम्यान, छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवरदेखील बॅनर लावल्याचा प्रकार समोर आला आहे. सी.आर.सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर प्रकाश भालचंद्र शेलटकर, संगीता ताई शिंदे, राजाभाऊ गोळे, हेमचंद्र ऊर्फ दादा मोरे असे शुभेच्छुकांची नावे आहेत (Cake cutting by Chhota Rajan supporters).

छोटा राजन कोण आहे?

छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निखलजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक तिकीट विकण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडून त्याने चुकीच्या आणि गुन्हेगारीच्या अनेक गोष्टी शिकल्या. येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला. त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये शिक्षा भोगतोय.

छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI