AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा तरुणांसाठी ‘सारथी’मार्फत उपक्रम राबवा; प्रतीक पाटलांची अजितदादांकडे मागणी

सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या हितासाठी नवे उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन प्रतीक जयंतराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिले.

मराठा तरुणांसाठी 'सारथी'मार्फत उपक्रम राबवा; प्रतीक पाटलांची अजितदादांकडे मागणी
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 6:14 PM
Share

मुंबई : मराठा तरुणांच्या हितासाठी ‘सारथी’ संस्थेमार्फत नवीन उपक्रम राबविण्यात यावे; अशी मागणी प्रतीक पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केलीय. सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या हितासाठी नवे उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन प्रतीक जयंतराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिले.

प्रतीक जयंतराव पाटील सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतीक जयंतराव पाटील सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत असल्याचे चित्र आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या ‘सेवासदन’ या शासकीय निवासस्थानी आले असता प्रतीक पाटील यांनी निवेदन दिले.

संस्थेच्या माध्यमातून अधिक नवे उपक्रम राबवले जाणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सारथी’ संस्था ही मराठा समाजातील युवक-युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उत्कृष्ट कार्य करीत आहे. मात्र या संस्थेच्या माध्यमातून अधिक नवे उपक्रम राबवले जाऊ शकतात, असे मत प्रतीक जयंत पाटील यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रशिक्षण, कौशल्य विकास या त्रिसूत्रीच्या आधारे सारथीने काम केल्यास मराठा समाजातील युवक – युवतीच्या विकासासाठी मोठे काम होईल, असे प्रतीक पाटील यांनी निवेदनात म्हटलेय.

प्रतीक जयंतराव पाटलांच्या निवेदनातील 10 महत्त्वाच्या मागण्या

1. सारथीतर्फे मराठा समाजातील युवक- युवतींना IIT आणि IIM या जागतिक दर्जाच्या भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष प्रशिक्षणाचे कोर्सेस आयोजित करावेत. त्यासाठी शालेय पातळीपासूनच प्रबोधन करता येईल. 2. दहावी-बारावीच्या गुणांवर पुढील प्रवेश अवलंबून असल्याने दहावी-बारावीतील गुण अधिक असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मराठा समाजातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करावेत. 3. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी, जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषांचे वर्ग सुरू करावेत. 4. इतर व्यावसायिक कौशल्ये जसे की सुतारकाम, प्लंबर, इत्यादीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. 5. जागतिक दर्जाच्या विद्यापीठात शिकण्यासाठी मराठा समाजाच्या 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देणे. 6. मराठा समाजातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना विशेष प्रोत्साहनपर भत्ता सुरू करणे. 7. मराठा समाजातील उद्योगपतीचा एक सेतू उभारून व्यवसायाभिमुक कौशल्ये विकसित होण्यासाठी केंद्र सुरू करणे. 8. मराठा समाजातील मुला- मुलींसाठी पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे हॉस्टेल्स उभारणे. 9. मराठा समाजातील भूमिहीन आणि अल्पभूधारक व्यक्तींच्या पाल्यांचा डाटा जमा करून ते शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर फेकले जात नाहीयेत, याचे ट्रॅकिंग करणे, शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर गेलेल्या मुला- मुलींना प्रवाहात आणणे. 10. जीवनाच्या विविध क्षेत्रात जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या व्यक्तींचे सारथीसाठी सल्लागार मंडळ स्थापन करून वेळोवेळी नवीन धोरणे ठरवून अंमलात आणणे.

दरम्यान, नुकत्याच आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरावेळीही सांगली येथे प्रतीक जयंतराव पाटील मंत्री जयंतराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. पुरातील लोकांचे प्राण वाचवणे, त्यांना अन्न पाण्याचा वाटप करणे, मुक्या जनावरांची देखभाल घेण्याचे काम प्रतीक यांनी आपल्या हाती घेतले होते.

संबंधित बातम्या

‘या’ डिजिटल कंपनीची 10 हजार लोकांना नोकऱ्या देण्याची योजना, लवकरच नोकरभरती

सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! पुढील 3-5 वर्षांत त्याचा भाव दुप्पट होणार

Carry out activities for Maratha youth through ‘Sarathi’; Pratik Patil’s demand to Ajit Pawar

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.