शिंदे गटात गेलेल्या महिला पदाधिकाऱ्याला धमकी, गुन्हा दाखल

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपसोबत गेले. शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर सतत आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यांच्यातील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याला धमकी देण्यात आली.

शिंदे गटात गेलेल्या महिला पदाधिकाऱ्याला धमकी, गुन्हा दाखल
| Updated on: May 10, 2024 | 2:41 PM

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपसोबत गेले. शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर सतत आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यांच्यातील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याला धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दोन दिवसात राजकारण सोडून संन्यास घ्या किंवा कल्याण सोडून निघून जा नाहीतर संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. माजी नगरसेवक विजया पोटे व अरविंद पोटे यांना ही धमकी मिळाली आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ माजली आहे.

माजी नगरसेवक असलेल्या माजी नगरसेवक विजया पोटे व अरविंद पोटे यांनी नुकताच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर हरीचंद्र गौरु हरदास उर्फ बाळा हरदास या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने अरविंद पोटे यांना धमकी दिली असा आरोप पोटे यांनी केला. धमकी मिळाल्यानंतर पोटे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळ हरदास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

माझ्यावरचे आरोप चुकीचे

या धकमीमुळे शहरातील वातावरण तापल आहे. मात्र दुसरीकडे बाळा हरदास यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, मी कोणालाही धमकी दिली नाही, असे त्यांनी म्हटले. मी शिवसेनेचा ज्येष्ठ, ही लोक का गेली हे विचारण्यासाठी मी फोन केला असा खुलासा बाळा हरदास यांनी केला.

Follow Us