AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ महिन्यांच्या गर्भवती निदा खान हिच्या आयुष्यात संकटा मागे संकटे, थेट पतीनेच कोर्टात..

नाशिक येथील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला जामीन मंजूर करण्यात आला. त्यातच आता तिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय.

आठ महिन्यांच्या गर्भवती निदा खान हिच्या आयुष्यात संकटा मागे संकटे, थेट पतीनेच कोर्टात..
Nida Khan
| Updated on: Oct 04, 2026 | 11:11 AM
Share

नाशिक येथील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला जामीन मंजूर करण्यात आला. निदा खान ही आठ महिन्यांची गर्भवती आहे. नाशिक सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा एजाज खान हिच्यावर कारवाई करण्यात आली होती. गर्भवती असतानाही जेलमध्ये राहण्याची वेळ आली. तिच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी तौसिफ बिलाल आत्तार यालाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संबंधित गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.. नाशिकमधील या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.

त्यातच आता या प्रकरणातील आरोपी असलेल्या निदा खान हिच्या आयुष्यात मोठे संकट आल्याचे बघायला मिळतंय. तिच्या अडचणीत मोठी वाढ झाली. न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करत असताना निदा खान हिच्यासमोर वैवाहिक आयुष्यात मोठे संकट आले. आठ महिन्यांची निदा गरोदर आहे. 2 ते 3 वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. निदाचा काैटुंबिक कलह टोकाला गेला.

निदाच्या पतीने थेट कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. याच अर्जाची दखल घेत निदाला कोर्टाने समन्स बजावला आहे. 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयात तिला प्रत्यक्षात हजर होण्याचा आदेश दिला. बहुराष्ट्रीय कंपनीतील पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून निदा खान हिच्यासह अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने निदाचा जामीन मंजूर केला.

26 मार्चपासून या गंभीर गुन्ह्यामध्ये नाव आल्यापासून पोलिस तपास आणि न्यायालयीन चाैकशीच्या सावटामुळे निदाच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाला. बदनामी आणि ओढवलेली नामुष्की यामुळे निदाच्या नवऱ्याने थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कायदेशीर प्रक्रिया, गरोदर, सामाजिक दबाव यात निदाचा संसारची तुटताना दिसतोय. आता यावर कोर्ट काय निर्णय देते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर