AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमपीएससी आंदोलकांना मोठा धक्का! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवार म्हणाले…

पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर रोहित पवार आक्रमक झाले आहेत.

एमपीएससी आंदोलकांना मोठा धक्का! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवार म्हणाले...
| Updated on: Oct 09, 2026 | 3:56 PM
Share

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे. १५ एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे एमपीएससी आंदोलनप्रकरणी १५ विद्यार्थ्यांवर पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. एस एम जोशी मार्गावर हे आंदोलन सुरू आहे. मुख्य आयोजक प्रमोद पाटील, अक्षय कांबळेसह १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरला बेकायदेशीर जमावाप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागे आम्ही वकिलांची फौज उभी करू. विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे जामीनपात्र आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे. पोलिसांवर दबाव आहे. म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी नक्षलवादी आहेत का? कोर्टाची ऑर्डर विद्यार्थ्यांच्या बाजूने येईल, असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

रोहित पवार म्हणाले की, MPSC चे शुद्धीकरण व्हावे यासाठी आज सायंकाळी आपण गंगाआरती करणार आहोत. पुणे महापालिकेने किती नदी शुद्ध केली आहे ते आज आपल्याला कळेल. पण कोणतीही नदी असली तरी ती आपल्याला पवित्र अशीच आहे. सरकारने दिल्लीतील आंदोलनाला जाण्यासाठी रेल्वे बंद केल्या आहेत. ज्यांना दिल्लीला जायचे होते त्यांनी इथे आंदोलनात यावे, असं आवाहन यावेळी रोहित पवारांनी केले आहे.

एमपीएससी आंदोलनाचा आज ९ वा दिवस आहे. एमपीएससी आंदोलनामध्ये अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या सात उपोषणकर्त्यांपैकी तीन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडल्याचे समोर आले होते. मध्यरात्री ही आंदोलनस्थळी आंदोलकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. आंदोलनकर्ते रस्त्यावर झोपून असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता याची चर्चा होत आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू