AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दगडांवरून फिंगरप्रिंट घेणार अन् आधारशी…सीजेपी आंदोलनाचा तपास दिल्ली पोलीस कसा करतायत? चंद्रकांत पाटील म्हणाले…

का बाजूने राहुल गांधी आरोप करत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी त्यांच्या आधुनिक तंत्राच्या मदतीने त्या आंदोलनात परदेशी लोक किती होते, याची आकडेवारीच समोर आणली आहे. आता पोलिसांनाही त्यांचा दावा खरा असल्याचे सांगावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दगडांवरून फिंगरप्रिंट घेणार अन् आधारशी...सीजेपी आंदोलनाचा तपास दिल्ली पोलीस कसा करतायत? चंद्रकांत पाटील म्हणाले...
cjp delhi protest and cjp delhi protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2026 | 5:17 PM
Share

CJP Delhi Protest : आपले आंदोलन संपल्यानंतर आता आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यावर वेगवेगळ्या राज्यात कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. आम्ही कोणत्याही आंदोलकावर कारवाई करणार नाही, असे आश्वासन केंद्राने दिले होते. परंतु तरीदेखील केंद्र सरकार हे आश्वासन मोडत आहे, असं म्हणत सीजेपीने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. दरम्यान, असे असतानाच आता भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. महाराष्ट्रातील एका पत्रकाराच्या रिपोर्टचा आधार घेत चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी सापडणाऱ्या वस्तूंवरील फिंगरप्रिंट घेऊन त्याच्या मदतीने आंदोलनातील मोठ्या आरोपींची शोध घेत आहेत, असं ते म्हणाले आहेत.

तो रिपोर्ट पाहून चक्करच येईल

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी केली आहे. त्यांच्याच आदेशानुसार विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मादतीने हल्ले झाले, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे यावर तुमचे मत काय, असा सवाल एका पत्रकाराने चंद्रकांत पाटील यांना केला. यावरच बोलताना त्यांनी राज्यातील एका पत्रकाराच्या रिपोर्टचा आधार घेत दिल्ली पोलिसांच्या तपासावर भाष्य केले. लोकशाहीत कोणीही आरोप शकतो. लोकशाहीचे हेच खरे सौंदर्य आहे. आरोप केला म्हणजे तो खरा असतो, असा त्याचा अर्थ नसतो. मी काल एका पत्रकाराचा व्हिडीओ पाहिला. तो रिपोर्ट पाहून चक्करच येईल. त्या आंदोलनात किती लोक होते? त्यातील कोण-कोण किती गुन्ह्यांमध्ये सहभागी होते, असे पोलिसांनी विश्लेषण केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गंभीर गुन्ह्यात आरोपी असणारे…

तसेच, पोलिसांनी त्या आंदोलनातील अगदी छोटासा दगडही जमा केलेला आहे. त्या दगडावर बोटाचे साधे ठसे असले तरीही ते आधार क्रमांकाशी लिंक होणार आहेत. त्याच्याच आधारे बहुतेक संबंधित प्रकाराचा तो रिपोर्ट आहे. गंभीर गुन्ह्यात आरोपी असणारे त्या आंदोलनात किती होते, याचा तपास केला जाणार आहे, असं विधानही त्यांनी केलं. हा दावा मी करत नाही, एका पत्रकाराच्या रिपोर्टमध्ये ते दिलेलं असून तेच मी सांगतोय, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनाही त्यांचा दावा खरा…

एका बाजूने राहुल गांधी आरोप करत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी त्यांच्या आधुनिक तंत्राच्या मदतीने त्या आंदोलनात परदेशी लोक किती होते, याची आकडेवारीच समोर आणली आहे. आता पोलिसांनाही त्यांचा दावा खरा असल्याचे सांगावे लागेल. राहुल गांधींनाही त्यांनी केलेले आरोप सत्य असल्याचा पुरावा दाखवावा लागेल, असंही मत पाटील यांनी व्यक्त केलं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा