चंद्रपुरात येणारा 50 लाखांचा दारुसाठा आमदाराने पकडला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

| Updated on: Jan 20, 2021 | 8:32 AM

पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि समर्थकांनी जिल्ह्यात बेधडक येणारे ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

चंद्रपुरात येणारा 50 लाखांचा दारुसाठा आमदाराने पकडला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉईंटवर (Chandrapur Liquor Seized By MLA Kishor Jorgewar) शहरात येणारा 7 पिकअप वाहन भरुन देशी दारुचा साठा पकडला. पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि समर्थकांनी जिल्ह्यात बेधडक येणारे ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील दारुबंदी विरोधातील पोलीस कारवाई थंडावल्याची कुजबुज होती (Chandrapur Liquor Seized By MLA Kishor Jorgewar).

आमदारांनी पकडेला हा एकूण मुद्देमाल 50 लाखांहून अधिक रकमेचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलडाणा पासिंगचे हे पिकअप शेकडो पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील नाकेबंदी चुकवून जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचल्याने पोलीस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पडोली पोलीस ठाण्यात सध्या या वाहनांवर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदावर असल्याचे बोलले जाते. मात्र, याचा नमुना आज बघायला मिळाला. चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉईंटवर पाळत ठेवून शहरात येणारा 7 पिकअप वाहन भरुन देशी दारुचा साठा पकडल्याने खळबळ उडाली आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि समर्थकांनी गुप्त माहितीच्या आधारे अभियान राबविले.

यात जिल्ह्यात बेधडक येणारे अवैध दारु वाहने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली गेली. गेले काही महिने जिल्ह्यातील दारुबंदी विरोधातील पोलीस कारवाई थंडावल्याची कुजबुज होती. त्याचा प्रत्यय या कारवाईने आला. हा एकूण मुद्देमाल 50 लाखांहून अधिक रकमेचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलडाणा पासिंगचे हे पिकअप शेकडो पोलीस ठाणे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नाकेबंदी चुकवून जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचल्याने चंद्रपूर पोलीस दलाच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे (Chandrapur Liquor Seized By MLA Kishor Jorgewar).

दरम्यान, ही कारवाईची माहिती देण्यासाठी फोन केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांच्याशी अपमानास्पद संभाषण केल्याची बाब आमदार जोरगेवार यांनी बोलून दाखवली. सध्या पडोली पोलीस ठाण्यात या खळबळजनक कारवाईची गुन्हे नोंद प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी या घटनेतील वाहक-चालकांना ताब्यात घेतले आहे.

Chandrapur Liquor Seized By MLA Kishor Jorgewar

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा एका महिलेचा खून

मोबाईल न दिल्याचा राग, मुलाकडून बापाच्या डोक्यात चोपणीने वार

बाप, लखनौमधून लेकी पाठोपाठ नागपुरात आला, सासरच्यांनी काटा काढला!