Chhaava Ncp : NCP कार्यकर्त्यांच्या मारहाणीनंतर छावा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची पहिली प्रतिक्रिया
Chhaava Ncp : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना काल जबर मारहाण झाली. त्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. राज्याचे कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून छावाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गेले होते. त्यावेळी मारहाणीची घटना घडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते भिरवकल्याच्या आरोपावरुन काल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी जबर मारहाण झाली. या सगळ्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विजयकुमार घाडगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या मारहाणीवर विजयकुमार घाडगे आता स्वत: बोलले आहेत. “काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरला आले होते. राज्याच्या कृषीमंत्र्यांनी याआधी सुद्धा शेतकऱ्यांना माजोरा शब्द वापरलेला. शेतकरी कर्ज घेऊन मुलाबाळांची लग्न थाटामाटात करतात. पुन्हा कर्जमाफी मागतात अशा प्रकारच बेताल वक्तव्य शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषीमंत्र्यांनी केलं होतं” असं विजयकुमार घाडगे म्हणाले.
“परवा कहर केला. राज्याच्या विधिमंडळ सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ आला. आम्ही त्याचा निषेध म्हणून ज्या पक्षातून ते आले आहेत, त्या पक्षाच्या अध्यक्षांकडे आम्ही मागणी करायला गेलेलो. अशा चुकीच्या व्यक्तीला त्या पदावरु ठेऊ नका. राज्यातला शेतकरी या पदाकडे न्यायाच्या अपेक्षेने बघतो आणि असे रमी खेळणाऱ्या लोकांना त्या पदावर बसवत आहात. शेतकऱ्याला न्याय कोण देणार? ते पद इतकं महत्त्वाच आहे की, त्या ठिकाणी कायदे बनतात. त्या सभागृहाच पावित्र्य राखलं गेलं पाहिजे” असं विजयकुमार घाडगे म्हणाले.
सत्तेचा माज दिसला
“या पदावरुन त्यांना हटवा. रमी खेळतात म्हणून आम्ही प्रतिकात्मक पत्ते दिले. त्यांना घरी पाठवा. घरी रमी खेळायला सांगा. लाखो लोकांनी तुम्हाला निवडून दिलय. शेतकऱ्यांचा कृषीमंत्री अवमान करतायत हे तटकरेसाहेबांनी ऐकून घेतलं. त्यावेळी संजय बनसोड, बाबासाहेब पाटील तिथे होते. आम्ही त्यानंतर खाली निघून आलो. लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे तिथे होते. आम्ही तिथे बसलो होतो. पत्रकारांसोबत चर्चा सरु होती. 50-60 लोकांचा जमाव तिथे आला. आमच्या नेत्यावर पत्ते भिरकावतोस काय? असं म्हणून मारहाण सुरु केली. एवढं मारलं की, सत्तेचा माज काय असतो, ते राष्ट्रवादीच्या गुंडांकडून बघायला मिळालं” असं विजयकुमार घाडगे म्हणाले.
