अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांवर कोरोनाचं सावट, छगन भुजबळ म्हणतात…

नाशिकमध्ये येत्या 26 ते 28 मार्च दरम्यान 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. (akhil bharatiya marathi sahitya sammelan)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांवर कोरोनाचं सावट, छगन भुजबळ म्हणतात...

नाशिक : येत्या 26 ते 28 मार्चदरम्यान 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र वाढत्या कोरोनामुळे हे संमेलन होणार की नाही, अशी साशंकता व्यक्त केली जात होती. पण “कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्व नियम पाळूनच संमेलन होईल,” अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. (Chhagan bhujbal on 94th akhil bharatiya marathi sahitya sammelan)

नाशिकमध्ये येत्या 26 ते 28 मार्च दरम्यान 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील आणि साहित्य संमेलन सदस्य यांच्यात बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

“साहित्य संमेलनात खबरदारी घेतली जाणार”

“कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्व नियम पाळूनच संमेलन घेण्यात येईल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. मात्र साहित्य संमेलनाचं उद्धाटन कोणाच्या हस्ते होणार यावर मात्र अजून चर्चा सुरु आहे. या साहित्य संमेलनात कोविड विषयी सर्व खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर अधिक प्रमाणात केला जावा. मास्क न लावलेल्या व्यक्तीला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही,” असेही भुजबळांनी यावेळी सांगितले.

“94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची माहिती घेतली. तसेच कौतीकराव ठाले पाटील यांनी जागेची पाहणी केली. यामध्ये 39 समित्या वेगवेगळं काम करत आहेत. त्यात राहण्याची व्यवस्था ही केली जाणार आहे. त्यासाठी विविध संस्थांची मदत घेतली जाते. लेखकांच्या पुस्तकांच प्रदर्शन भरणार आहे. संमेलनासाठी आतापर्यंत 2 हजार 207 कविता प्राप्त करण्यात आले आहे. तसेच साहित्य संमेलनात 400 स्टॉल्स असणार आहेत. त्याशिवाय ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाणार आहे,” असेही छगन भुजबळ म्हणाले.

नाशिकमध्ये नाईट कर्फ्यू 

नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात 534 रुग्ण वाढले आहेत.  यात सर्वाधिक रुग्ण हे नाशिक शहरात आढळले आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेगही वाढला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठोस उपाययोजना करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.

जर कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम तीव्र करु, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. यापुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करु, असे छगन भुजबळ म्हणाले. (Chhagan bhujbal on 94th akhil bharatiya marathi sahitya sammelan)

संबंधित बातम्या : 

कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढला, नाशिकमध्ये संचारबंदी लागू, छगन भुजबळांकडून घोषणा

कोरोना वाढतोय, तरी लोकांमध्ये दहशत निर्माण करु नका : प्रवीण दरेकर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI