AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी एक..

Chhagan Bhujbal : "ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे. आमचे मराठी भाषिक व्यवसायासाठी दुसऱ्या राज्यात जातात ते तिकडची भाषा बोलतात. कुठलीही भाषा ही आलीच पाहिजे. पहिल्या पासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती"

Chhagan Bhujbal : सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी एक..
Chhagan Bhujbal-Supriya Sule
| Updated on: May 01, 2026 | 1:47 PM
Share

मराठी भाषेचा सन्मान, गॅस दरवाढ आणि सुप्रिया सुळे यांचा बारामतीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय यावर राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ बोलले आहेत. छगन भुजबळ राज्य सरकारमधील अनुभवी मंत्री आहेत. त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवण्यापासून वेगवेगळ्या पदांचा अनुभव आहे. आजपासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची होणार होती. पण विरोधानंतर सरकारने हा निर्णय पुढे ढकलला.

“ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे. आमचे मराठी भाषिक व्यवसायासाठी दुसऱ्या राज्यात जातात ते तिकडची भाषा बोलतात. कुठलीही भाषा ही आलीच पाहिजे. पहिल्या पासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती. माझं असं मत आहे की आठवड्यातून एक दिवस किंवा 1 तास मराठी भाषा जुजबी मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे. ठीक आहे तुम्ही सांगा मी शिकेल. भाषेचा अपमान करता येणार नाही” असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

बांगलादेश, पाकिस्तान तिकडे तर मिळतच नाहीये

“गॅस कुठून येतो, कसा येतो, आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपल्याकडे महाग आहे. मात्र बाकीच्या ठिकाणी मिळतच नाहीये. बांगलादेश, पाकिस्तान तिकडे तर मिळतच नाहीये. एखाद्या गोष्टीत डिमांड आणि सप्लाय मध्ये फरक पडला तर नक्कीच त्याच्या किमती कमी-जास्त होत असतात. मात्र मोदी साहेबांच्या प्रयत्नांमुळे, आधी 27 देशातून गोळा करत होतो, आता 40-45 देशातून करतोय. त्यामुळे आपल्या चाललंय. ज्यांचे चार-पाच कोटीचे देश आहेत, त्यांचे बंद पडले, मात्र आपला 140 कोटीचा देश असून देखील भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे चाललय सर्व” असं गॅस दरवाढीवर छगन भुजबळ म्हणाले.

त्याच्यात काहीही वाईट नाही

“खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “चांगली गोष्ट आहे. स्वागत आहे त्यांचं. त्याच्यात काहीही वाईट नाही. त्यांनी एक रोड मॅप आखून दिला आहे. पवार विरुद्ध पवार कुटुंबियांनी लढायचं नाही. चांगली गोष्ट आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!