AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : या 5 चुका टाळा; आयुष्यात येईल सुख, समुद्धी, घर पैशांनी भरून जाईल

आपण अनेकदा अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तसेच गृहकलह देखील वाढतो. आज आपण घरात वास्तुदोष निर्माण होऊ नये, यासाठी काय करावं? याबाबत जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : या 5 चुका टाळा; आयुष्यात येईल सुख, समुद्धी, घर पैशांनी भरून जाईल
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 18, 2026 | 9:40 PM
Share

वास्तुशास्त्र हे केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देत नाही. तर तुमच्या घरात कशामुळे वास्तुदोष निर्माण होतो? तो दूर करण्याचे नेमके काय उपाय आहेत? त्याचबरोबर जर एखाद्याच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याबद्दल देखील माहिती वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही छोट्या-मोठ्या चुका करतो, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. जर एखाद्याच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर त्यामुळे अशा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, जसं की आर्थिक समस्या येतात. काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. त्यामुळे वास्तुदोषाचं वेळीच निवारण करणं गरजेचं असतं. आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

नळाचं पाणी – जर तुमच्या घरात नळ गळत असतील तर ते आजच बदलू घ्या, कारण घरात गळके नळ ठेवणं हे वास्तुशास्त्रात अशुभ माण्यात आलं आहे. यामुळे आर्थिक हानी होते. सोबतच तुमच्या प्रगतीच्या संधीमध्ये देखील बाधा निर्माण होण्याची शक्यता असते.

फाटके कपडे – जर तुम्ही देखील घरात वर्षानुवर्ष जुने आणि फाटलेले कपडे साठवून ठेवले असतील तर ते कपडे घराबाहेर काढा. कारण असे कपडे घरात ठेवणं हे वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. यामुळे घरातील सुख शांतीच्या मार्गात बाधा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बिघडलेले घड्याळ – वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाला गतीचं प्रतिक माण्यात आलं आहे, त्यामुळे घरात कधीही तुटलेलं किंवा बिघडलेलं घड्याळ असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. जर घरात बिघडलेलं घड्याळ असेल तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

पूर्वजांच्या फोटोची दिशा – अनेक जण आपल्या घरात आपल्या पूर्वजांचे फोटो लावतात, घरात पूर्वजांचे फोटो असणं शुभ मानलं जातं, परंतु पू्र्वजांचे फोटो हे नेहमी दक्षिण दिशेलाच असावेत. जर तुम्ही पूर्वजांचे फोटो इतर दिशेला लावले तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

पाण्याचा अति वापर – वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात पाण्याचा अतिवापर होतो, त्या घरात खर्चामध्ये वाढ होते. पैसा हातात टिकत नाही. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमजोर असतो, अशा लोकांना देखील पाण्याची नासाडी टाळण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल