AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबाद गॅझेटचा भुजबळांनाही धसका, आरक्षणाबाबत केलं सर्वात मोठं भाकीत

मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटवर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांजे पाटील यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

हैदराबाद गॅझेटचा भुजबळांनाही धसका, आरक्षणाबाबत केलं सर्वात मोठं भाकीत
| Updated on: Sep 08, 2025 | 4:40 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर अखेर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला आहे, मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आता ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे, ओबीसी समाजाकडून सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या गॅझेटवर प्रतिक्रिया देताना मोठं भाकीत केलं आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

वेगवेगळ्या संघटना आहेत ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं मत प्रदर्शित करत आहेत. मी ही माझ्या पद्धतीनं जाणार आहे, समता परिषद ही आपल्या पद्धतीनेच जात आहे. हैदराबाद गॅझेटचा जीआर आहे, त्याची शब्दरचना ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे. खरं -खोटं काय आहे? ते  बघायला पाहिजे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांची मराठा एकच जात आहे, मात्र ओबीसीच्या 374 जाती आहेत,  सगळ्यांचं मत एकच आहे आरक्षणाला धक्का लगता कामा नाही. गावागावात आंदोलनं तर होतच आहेत, पण आता संपूर्ण ओबीसी समाज आंदोलनात उतरेल, असा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आता सगळं त्यांचचं राज्य आहे. त्यांनी महाराष्ट्राला विकत घेतलं आहे. कोर्टात नक्की जाणार, सध्या सुट्टी आहे, असं वकील बोलले, पण एक-दोन दिवसांत आम्ही नक्की कोर्टात जाऊ, तो जीआर मला दाखवला नाही, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 ओबीसी समाजाची बैठक 

दरम्यान दुसरीकडे आज मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटर येथे या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली.  सकल ओबीसी संघटना यांच्याकडून या  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  मराठा समाजाला ओबीसीमधून मिळत असलेल्या आरक्षणाचा यावेळी विरोध करण्यात आला. सरकारने काढलेल्या जीआरवर देखील या बैठकीत चर्चा झाली.  सरकारने काढलेल्या जी आरच्या विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई कशी लढायची याबाबत कृती आराखडा तयार करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी