AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 महिन्यात सगळं संपलं! पत्नी करायची नको तेच, नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

छत्रपती संभाजीनगरमध्ये पती-पत्नीमधील सततच्या वादाला कंटाळून एका २२ वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या मित्रानेच त्याला नको त्या अवस्थेत पाहिले आणि पोलिसांना फोन केला.

6 महिन्यात सगळं संपलं! पत्नी करायची नको तेच, नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजीनगरImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 26, 2026 | 12:24 PM
Share

छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव शेणपूंजी परिसरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाने इतके भीषण रूप धारण केले की, एका २२ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पवन ज्ञानेश्वर भुते असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पवनचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने रंगवण्याच्या वयात पवन आणि त्याच्या पत्नीमध्ये मात्र घरगुती कारणांवरून सतत खटके उडत होते. या दररोजच्या वादांमुळे पवन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अखेर या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनप्रवास संपवला.

भावाच्या सतर्कतेमुळे घटना उघड

पवनने आत्महत्या केल्याचे सर्वात आधी त्याच्या शेजारी राहणाऱ्या भावाच्या लक्षात आले. खिडकीतून पाहिले असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. भावाने कोणताही विलंब न लावता तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो तोडून आत प्रवेश केला. यावेळी पवनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे.

अवघ्या सहा महिन्यांच्या संसाराचा असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने एक हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत असून वादाचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेत आहेत.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...