AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

khavdya dongar : खनिज, 150 कोटींचा दंड आणि बरंच काही; खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती समोर

खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती समोर आहे. या डोंगरावर बेकायदा उत्खनन झाल्याचेही माहितीतून समोर आलं आहे.

khavdya dongar : खनिज, 150 कोटींचा दंड आणि बरंच काही; खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती समोर
khavdya dongar Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 11:48 AM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या 19 वर्षीय कुणाल चांदगुडे आत्महत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. अख्ख चांदगुडे कुटुंब या खवड्या डोंगरावरून कोसळून संपलं. मुलगा, पतीच्या मृत्यूनंतर आईनेही डोंगरावरून उडी मारून आयुष्य संपवलं. या खळबळजनक घटनेमुळे खवड्या डोंगराची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. आता या डोंगराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

खवड्या डोंगरावर बेकायदा उत्खनन 

छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव शिवारात शासकीय मालकीचा हा खवड्या डोंगर आहे. या डोंगराला गौण खनिजांच्या बेकायदा उत्खननामुळे पोखरण्यात आला. खोल खाणी, असुरक्षित अशा भागांमुळे हा परिसरात दुर्घटनेचा स्पॉट ठरू लागला आहे. मागील सहा वर्षांत डोंगर परिसरात 7 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या खवड्या डोंगराचे विनापरवाना उत्खनननही केल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत 150 कोटींच्या दडांत्मक नोटिसा बजवाल्या, असल्याचेही समोर आलं आहे. विनापरवाना उत्खनन प्रकरणात अद्याप दंडवसुली झालेली नाही.

चांदगुडे कुटुंब आणि खवड्या डोंगर

मुरधीर चांदगुडे यांच्या संसारात एका नातेवाईक महिलेच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण झाल्याचा आरोप आहे. त्यांच्या एका मुलाचा आठ वर्षांपूर्वी झाला होता. त्याचा मानसिक आघात कुटुंबावर झाला. त्यामुळे कौटुंबिक दरी वाढत गेल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकांनी पतीला त्रास दिल्याचाही आरोप संगीता यांनी केला होता. 8 वर्षांपूर्वी मुलाच्या मृत्यूचा चांदगुडे कुटुंबावर मोठा आघात झाला होता. त्यात मानसिक आघात झालेल्या चांदगुडे कुटुंबातील कुणाल खवड्या डोंगरावर पोहोचला होता. सोशल मीडियावरही कुणालचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आता या प्रकरणावरून सोशल मीडियावरही वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. काही दिवसांआधी संगीता चांदगुडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ चांदगुडे एका नातेवाईकावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांनी उल्लेख केलेली व्यक्ती कोण, यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. आता पोलीस तपासानंतरच या प्रकरणाची सर्व माहिती समोर येईल. पोलिसांनी या प्रकरणी जलद गतीने तपास सुरू केला आहे.

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती