AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबाचा मोठा निर्णय! तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी, नेमकं कारण काय?

Khavdya Dongar Case: तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र झाले नाहीत. पोस्टमार्टमनंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आले. मात्र नातेवाईकांनी मुरलीधर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेला, तर संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह आईच्या गावी मुकुंदवाडी येथे नेऊन तिथे अंत्यसंस्कार केले.

Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबाचा मोठा निर्णय! तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी, नेमकं कारण काय?
Khavdya DongerImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 9:43 AM
Share

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये मुरलीधर चांदगुडे, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांचा समावेश आहे. १८ वर्षीय कुणालच्या हट्टामुळे तिघांनाही जीव गमवावा लागला, अशी माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेची माहिती त्यांच्या आई-वडिलांना रात्री अंत्यसंस्कार होईपर्यंत नातेवाईकांनी कळू दिली नव्हती. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे.  एकाच कुटुंबातील असूनही तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र केले गेले नाहीत.

शुक्रवारी रात्री धनगरपिंपळगाव परिसरातील शिवलाल वस्ती येथील शेतात बारा ते साडेबारा या वेळेत मुरलीधर यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र झाले नाहीत. पोस्टमार्टमनंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आले. मात्र नातेवाईकांनी मुरलीधर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेला, तर संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह आईच्या गावी मुकुंदवाडी येथे नेऊन तिथे अंत्यसंस्कार केले. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र का केले गेले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

चांदगुडे कुटुंबातील वाद

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालच्या आजोळी सतत वाद सुरु होते. 20 वर्षांपूर्वी मूरलीधर यांनी स्वत:च्या मर्जीने लग्न केले आणि लग्न करताना आई-वडिलांना देखील सांगितले नव्हते. त्यामुळे चांदगुडे कुटुंबात वाद सुरु झाले होते. त्यानंतर मूरलीधर यांनी जमिनीच्या काही मोजकाच हिस्सा बहिणींना दिला होता. या सगळ्यामुळे कुणालदेखील नैराश्यामध्ये गेला होता.

मुरलीधर यांच्या ७५ वर्षीय वडिलांनी तीन एकर जमिनीव्यतिरिक्त काही जमीन कुणालच्या तीन आत्यांना दिली होती. या जमिनीच्या वाटपावरून कुणालच्या आई-वडिलांमध्ये सतत वाद होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळेच कुणाल आणि संगीता गावात फारसे दिसत नसत, असेही गावकऱ्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात