AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे कोण? ठाणे आणि कल्याणशी आहे खास संबंध

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट ठाण्यातील जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते. या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे कोण? ठाणे आणि कल्याणशी आहे खास संबंध
| Updated on: Aug 28, 2024 | 11:29 AM
Share

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आता याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांचे नाव आहे. या दोघांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची उभारणी करुन घेतली होती. हा पुतळा उभारण्याचे कंत्राट ठाण्यातील जयदीप आपटे या 25 वर्षांच्या तरुणाला देण्यात आले होते. यानंतर हा सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा जयदीप नेमका कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला होता. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट ठाण्यातील जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते. या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्ररायटर आहेत. तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते.

या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. हा पुतळा उभारण्यापूर्वी जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता. जयदीपने स्वत:च एका मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली होती. त्यामुळे इतका कमी अनुभव असलेल्या तरुण शिल्पकाराला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट कसे काय देण्यात आले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करणारा ठाण्यातील जयदीप आपटे (Jaydeep Apte) हा तरुण कोण, याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोण आहे जयदीप आपटे?

जयदीप आपटे हा मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीचा प्रोपरायटर आहे. तो कल्याणमध्ये राहतो. कल्याणमधील त्याच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे. त्यांच्या प्रभावामुळे आठवीत शिकत असतानाच जयदीपने कला क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे मूळ गाव कल्याण असून आई-वडील दोघेही नोकरी करतात. जयदीप आपटेचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.