वातानुकूलित बसेसचा कर कमी करा, अवजड वाहनांवरील प्रवेशबंदी उठवा, वाहतूक महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसेसचा कर कमी करणे, जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत 10 ते 16 तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठविणे, कालबाह्य प्रलंबित वाहतूक केसेस रद्द कराव्यात, सार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करणे, अशा मागण्या महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या. 

वातानुकूलित बसेसचा कर कमी करा, अवजड वाहनांवरील प्रवेशबंदी उठवा, वाहतूक महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 11:43 PM

मुंबई :  कोविडमुळे वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे वार्षिक मोटार वाहन करात सूट मिळावी. व्यवसाय करात सूट मिळावी. शाळा व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोटार कर पूर्ण माफ करावा. राज्यभरात वाहने व बसेस थांबण्यासाठी पार्किंग जागा उपलब्ध करुन द्यावी. कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसेसचा कर कमी करावा. जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत 10 ते 16 तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठवावी.  कालबाह्य प्रलंबित वाहतूक केसेस रद्द कराव्यात, सार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करावेत, अशा मागण्या महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या.

चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली व चर्चा केली. या भेटीत वाहतूक महासंघाने वरील मागण्या केल्या. या मागण्यानंतर राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात दिल्या जातील. त्यासाठी मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल. तसेच चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात देखील नियोजन करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

वाहतूकदारांच्या समस्येवर लगेच तोडगा काढला जाईल- ठाकरे

ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाची ठाकरे याच्यासोबत बैठक झाली यावेळी खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत कोविडमूळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल. वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या वेगवेगळ्या मागण्या 

वित्त व परिवहन विभाग, तसेच पोलीस यांच्याशी बोलून या मागण्यांसंदर्भात योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, उपाध्यक्ष महेंद्र लूले, सरचिटणीस दयानंद नाटेकर आदी उपस्थित होते

इतर बातम्या :

Video | एकीकडे फटाक्यांचा धडाम्… धूम आवाज, दुसरीकडे आगीचे लोट, पोलिसांची व्हॅन क्षणात जळून खाक

RBI ने SBI ला 1 कोटी, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेवर 1.95 कोटींचा दंड ठोठावला, जाणून घ्या कारण

College Reopening Guidelines : बुधवारपासून कॉलेज सुरु, विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचे अंतर, सरकारची नियमावली काय ?

(Chief Minister uddhav thackeray instructs for planning of buses and truck parking trauma care center near check post)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.