AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, यंदाच्या जयंतीला नियमावली काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, यंदाच्या जयंतीला नियमावली काय?
यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 3:39 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapti Shivaji Mahraj) यांच्या जंयती (Shivjayanti 2022) निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कोणताही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. कोरोनामुळे दोन वर्षातल्या प्रत्येक सण उत्सव, जयंतीवर काही ना काही निर्बंध राहिले आहेत. त्यामुळे किमान यंदा तरी शिवजयंतीसाठी निर्बंध शिथिल असावेत अशी मागणी करण्यात  येत होती. त्यानंतर लोकांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मोठी दिलासा देत. ही नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे यंदाची शिवजयंत धूमधडाक्यात पार पडणार आहे. या नव्या नियमावलीनंतर शिवभक्कांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तिसऱ्या लाटेला ब्रेक लावला

काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर पुन्हा वाढल्याने शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक करावे लागले होते. मात्र लसीकरण झाल्याने आणि लोकांमध्ये चांगल्या प्रकारची इम्युनिटी तयार झाल्याने कोरोनाची तिसरी लाट जास्त झळ पोहोवू शकली नाही, पाहता पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ब्रेक लागताना दिसून आला. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कडक केलेले निर्बंध पुन्हा शिथिल होऊ लागले आहेत. जग पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. तिसऱ्या लाटेल सुरूवातील मुंबईतील कोरोना रुग्णांचे आकडे पाहून धडकी भरत होती. मात्र मुंबईने पुन्हा मुंबई पॅटर्न दाखवत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ब्रेक लावला.

Video | काँग्रेसचा घडीभराचा टशन खत्म; अन् ‘सागर’मध्ये हास्य, विनोद, गप्पांची मैफल सुरू…!

राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदूहृदयसम्राट! घाटकोपरमधल्या बॅनरची चर्चा तर होणारच

संजय राऊतांसारखी भाषा आमच्या तोंडी शोभत नाही, त्यांना उत्तर द्यावंच लागेल; किरीट सोमय्यांचं पुन्हा चॅलेंज

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....