संजय राऊतांसारखी भाषा आमच्या तोंडी शोभत नाही, त्यांना उत्तर द्यावंच लागेल; किरीट सोमय्यांचं पुन्हा चॅलेंज

किरीट सोमय्यांनी यावेळी अनिल परब यांच्या रिसॉर्टवरुन देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे. केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

संजय राऊतांसारखी भाषा आमच्या तोंडी शोभत नाही, त्यांना उत्तर द्यावंच लागेल; किरीट सोमय्यांचं पुन्हा चॅलेंज
संजय राऊतांना सोमय्यांचे पुन्हा सवाल
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 2:09 PM

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उद्या शिवसेना (Shivsena) भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना भवनात मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांकडून (Kirit Somiaya) करण्यात येत असलेल्या आरोपांना संजय राऊत उत्तर देण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेताना मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता ते उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना विचारलं असता त्यांनी शुभकामना अशी प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्यांनी यावेळी अनिल परब यांच्या रिसॉर्टवरुन देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे. केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

मी मागे हटणार नाही

जे उखडायचे उखडा संजय राऊतांच्य वक्तव्यावर कानाला हात लावत ही भाषा आमच्या तोंडी शोभतं नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊत विषयाला बगल देतायेत, आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर संजय राऊतांना द्यावचं लागेल. मी मागे हटणार नाही माझी बांधिलकी जनतेशी आहे, असं सोमय्या म्हणाले. विषय कुठे नेताय ? उत्तर द्या !, असं आव्हान किरीट सोमय्यांनी संजय राऊतांना दिलं आहे. जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची उत्तर द्या ! मृत्यू नाहीत तर लोकांचे खून झालेत, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी हल्लाबोल केलाय.

अनिल परब यांच्या रिसॉर्टवर तोडक कारवाई कधी?

किरीट सोमय्या यांनी अनिल परबांचा रिसॉर्ट तोडलाचं पाहिजे, असं म्हटलंय. त्यासाठी जिल्हाधिकारी , जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे.केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात फायनल ऑर्डर आता आली आहे.ठाकरे सरकार का कारवाई करत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. रिसॉर्ट बांधणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या

VIDEO: नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

मै लिंक नही खोलूंगा…! नागपूर पोलिसांच्या क्रीएटीव्हीटीला तोड नाय, पुष्पाचा फोटो शेअर करत काय म्हणाले बघा

VIDEO: हमने बहोत बर्दाश्त किया, बर्बादही हम करेंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची डरकाळी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.