AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सूचना केली, मग माफी मागितली, पहिल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सभागृहातील पहिले भाषणही केले. यावेळी त्यांनी सर्व आमदारांची माफी मागितली.

आधी सूचना केली, मग माफी मागितली, पहिल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Dec 09, 2024 | 1:47 PM
Share

CM Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज महाराष्ट्र विधानसभेत विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी एकमताने भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सभागृहातील पहिले भाषणही केले. यावेळी त्यांनी सर्व आमदारांची माफी मागितली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात भाषण केले. यावेळी त्यांनी नवीन नियुक्त झालेल्या आणि जुन्या आमदारांना एक महत्त्वपूर्ण सूचना केली. ही सूचना करतेवेळी त्यांनी एक शब्दप्रयोग केला. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली.

पहिल्या भाषणात काय म्हणाले?

“योग्य वर्तन आणि शिस्त हा सभागृहाचा आत्मा आहे. मी आता तुमच्याकडे एक मागणी करु इच्छितो, या विधीमंडळात काम करायचं असेल तर काही शिस्त पाळली गेली पाहिजे. गेल्या काही वर्षात आपण या विधीमंडळातील लॉबीमध्ये चालायलाही जागा नसते, अशी अवस्था असते. उभं राहायलाही जागा नसते. इतक्या वर्ष ही अवस्था नव्हती. विधीमंडळात आमदारांनी समर्थकांना आणावं हे आपण करतो. पण अलीकडच्या काळात एक-एक आमदार २५-२५ लोक घेऊन येत आहेत. तिथेच उच्च अधिकारीही येतात. मग अशा स्थितीत चांगले काम होणार कसे?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितीत केला.

“विधीमंडळात बाजारासारखे वातावरण असू नये”

“या विधीमंडळात काम, चर्चा, अभ्यासू व्हायला हवं. मंत्र्यांकडून अपेक्षित आहे की त्यांनी चांगले उत्तर द्यायला हवं, पण मंत्र्यांच्या चेंबरमध्ये शिरायलाही जागा नसते, अशी अवस्था असते. आमदारांना याचं जर वाईट वाटलं तरीही कुठेतरी वर्षानुवर्ष या विधीमंडळाने जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे, तिथे नीट काम व्हायला पाहिजे. विधीमंडळात बाजारासारखे वातावरण असू नये, असा शब्द मी वापरतोय यासाठी मला माफ करा. पण मला दुसरा शब्द आठवत नाही. याची आपण काळजी घ्या, अशी मला अपेक्षा आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना