हाल सुरूच? एसटी कामगारांच्या संपावर आज तोडगा नाहीच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केले.

हाल सुरूच? एसटी कामगारांच्या संपावर आज तोडगा नाहीच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 1:37 PM

CM Eknath Shinde on ST Employees Strike : राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतंच ई गव्हर्नस कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलवलेली आहे, असे सांगितले. यामुळे आता एसटी कामगारांच्या संपावर आज तोडगा निघणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलवलेली आहे. यापूर्वीही एक बैठक पार पडली आहे. एसटी ही गावोगावी जाणारी आहे. त्यासाठी उद्या बैठक बोलवण्यात आलेली असून त्यात सकारात्मक चर्चा होईल. गणेशोत्सव जवळ आला आहे. अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठामध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही संप करु नका. आपण याबद्दल सकारात्मक चर्चा करु आणि चर्चेतून तुमचाही प्रश्न सुटेल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

प्रवाशांची गैरसोय

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. तसेच एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होताना दिसत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे. त्यासोबतच मूळ वेतनात जाहीर केलेल्या 5000, 4000 आणि 2500 रुपयांऐवजी सरसकट 5000 हजार रुपये मिळावेत, अशी मागणी एसटी कर्माचाऱ्यांकडून केली जात आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.