AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis : त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते, मग काय आम्हीच आमच्याविरोधात उमेदवार द्यायचा का? बिनविरोधच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी विरोधकांना घेरलं

महापालिका निवडणुकीत ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. यात सर्वाधिक उमेदवार महायुतीचे असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले. विरोधकांना उमेदवारच मिळाले नाहीत, म्हणून ही परिस्थिती उद्भवल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला.

Devendra Fadanvis : त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते, मग काय आम्हीच आमच्याविरोधात उमेदवार द्यायचा का? बिनविरोधच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी विरोधकांना घेरलं
बिनविरोधच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 12:26 PM
Share

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आणखी तीन दिवसांनी म्हणजे 15 तारखेला मतदान होऊन 16 ताखेला राज्याच्या 29 महापालिकांचा निकाल लागेल. त्यासारठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असून शहरोसहरी प्रचार सुरू असून मोठमोठ्या नेत्यांच्या सभाही गाजत आहेत. मात्र अद्याप निवडणूक झालेली नसतानाच राज्यातील अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. राज्यात एकूण 66 उमेदवार हे निवडणूक न लढवताच बिनविरोध निवडून आले असून त्यामध्ये महायुतीचे ,भाजप आणि शिंदे गटाचे सर्वाधिक उमेदवार आहेत. मात्र यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दमदाट्या करून, पैसे देऊन उमेदवार निवडून आणल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टीव्ही9 मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना बिनविरोध उमेदवारांवरून सवाल विचारला. तुमचे (भाजप) आणि शिंदे गटाचेच उमेदवार निवडणूक न लढवताही, बिनविरोध निवडून आले. दमदाटी करून, पैसे देऊन उमेदवार निवडून आणल्याचा आरोप विरोधक करत आहेत, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत उमेदवारांच्या निवडीबद्दल सांगितलं. तसंच त्यांनी याच मुद्यावरून विरोधकांनाही घेरलं.

जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे ?

या निवडणुकीमध्ये फक्त आमचे उमेदवार निवडून हे म्हणणं चुकीचं आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही उमेदवार निवडून आलाय ना. अपक्षांची काय ताकद असते ?. पण तोही आला ना ?. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला, उबाठाने नाही दिला. शरद पवारांनी उमेदवार दिला नाही. अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले. याचं उदाहरण कल्याण डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवलीत आमचे मागच्यावेळी १०५ निवडून आले. आमची शक्ती वाढली असं मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली, आता त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही. आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे का ? असा रोखठोक सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.

दीड दोन वर्षात कोणत्या भागात यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं ? 

याआधी भारताच्या लोकसभेत 35 खासदार बिनविरोध निवडून गेले. त्यातील 32 उमेदवार हे काँग्रेसच्या काळात गेले. पहिल्या तीन निवडणुकीचं सोडून द्या, पण आत्ताचंही उदाहरण आहे. मागच्या निवडणुकीत असे उमेदवार निवडून गेले. जर लोकसभेत बिनविरोध जाऊ शकतात, तर महापालिकेत का जाऊ शकत नाही ? असा थेट सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला. हे लोकं मुंबई नाशिकच्या बाहेर कुठे प्रचाराला गेले सांगा. दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं ? आपण हरलो तर ब्रँड राहणार नाही. म्हणून घराबाहेर पडलेच नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर, ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...