मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच शिवनेरीवर शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार?

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे हे एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा असेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच शिवनेरीवर शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार?

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे हे एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा असेल. शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ आहे. शिवरायांच्या जन्मस्थळावर उद्धव ठाकरे मोठी घोषणा (CM Uddhav Thackeray farm loan waiver) करण्याची शक्यता आहे. किल्ले शिवनेरीवर उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याचे संकेत आहेत. (CM Uddhav Thackeray farm loan waiver)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकवीरा देवीचं दर्शन घेतील. त्यानंतर शिवनेरी गडावर जाऊन शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असं म्हटलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे शिवनेरीला जाऊन आपला शब्द पूर्ण करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निकालानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेईन असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा करत आहेत. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याचीच उत्सुकता आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची रोड मॅप तयार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. संपूर्ण कर्जमाफीसाठी  35 हजार 800 कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्राच्या मदतीशिवाय कर्जमाफी देणे शक्य असल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत विविध खात्यांशी संबंधित आढावा घेतला होता. विमा कंपन्यांकडे 15 हजार कोटी थकीत आहेत. कर्जमाफीसाठी निधी उभारण्याचे अनेक पर्याय सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कर्जमाफीची घोषणा कधी करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *