धनंजय मुंडेंच्या कबुलीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Uddhav Thackeray Role About Dhananjay Munde Rape Allegation)

धनंजय मुंडेंच्या कबुलीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. (CM Uddhav Thackeray Role About Dhananjay Munde Rape Allegation)

धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला झालं आहे. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात दाखवलेला संयम आणि राज्याला दिलेला दिलासा सर्वांनी पाहिला आहे. उद्धव ठाकरेंना शालीन आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखलं जातं.

मात्र धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंवर अॅक्शन घेणार का? हा सवाल उपस्थित होत आहे. थेट महिलेने केलेले गंभीर आरोप, पोलिसांमध्ये दिलेली तक्रार असा नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणता पवित्रा घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मुंडे आणि ठाकरे घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई करताना मुख्यमंत्र्यांना हे संबंध आडवे येतील का? या बाबत अनके तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवाय धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. उद्या मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची वेळ आली तर पवार त्याला संमती देतील का? याबाबत काहीही सांगता येत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

काय आहे प्रकरण?

रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.

त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता.

यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.” (CM Uddhav Thackeray Role About Dhananjay Munde Rape Allegation)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

Published On - 10:08 pm, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI