मोठी बातमी! त्रिभाषा सूत्रासाठी आता नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती, राज्य सरकाराच मोठा निर्णय
मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. त्यानंतर आता डाॅक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. त्यानंतर आता डाॅक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचा अहवाल आल्यावर त्रीभाषा सुत्र लागू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढत होता. येत्या 5 जुलै रोजी याविरोधात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहाणार आहेत.
आज देखील याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनाला मनसेसह काँग्रेसच्या नेत्यांची देखील उपस्थिती होती. आझाद मैदान येथे शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून भाषा त्री सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द करण्यात आले आहेत.
समितीची स्थापना
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. त्यानंतर आता सरकारने या संदर्भात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. डाॅक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या समितीची स्थापन करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यावर त्रीभाषा सुत्र लागू केलं जाईल, 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 चे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत, अशा माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती.
