AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिक्षा- टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती; भुजबळ पहिल्यांदाच बोलले, मोठं वक्तव्य

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती करण्यात आली आहे, मराठी बोलता येत नेसल तर एक मे पासून परवाने निलंबित होणार आहेत, यावर आता भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

रिक्षा- टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती; भुजबळ पहिल्यांदाच बोलले, मोठं वक्तव्य
chhagan bhujbalImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 5:29 PM
Share

टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. जे रिक्षाचालक मराठी बोलू शकणार नाहीत, त्यांचे वाहन परवाने एक मे नंतर थेट रद्द करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांकडून या विरोधात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच सरकारमध्ये देखील या निर्णयावरून दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. काही नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे, तर काही जाणांकडून सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे. दरम्यान यावर आता मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

प्रचंड प्रमाणात हा वर्ग आहे. जो महाराष्ट्रातला नाही. दुर्दैवाने टॅक्सी रिक्षा चालवणारे अजूनपर्यंत मराठी शिकलेले नाहीत. या लोकांना आता मराठी शिकवावी लागेल. काहीतरी एक योजना आखतील ते. पीडब्ल्यूडी नुसतं सांगतंय यांचे पण एकेक दोन दोन दिवसाचे कोर्स घेतले पाहिजेत. अनेक नियम आहेत, पण ते कोणी पाळत नाहीत. आवश्यक मराठी त्यांनी शिकलं पाहिजे.  आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात. तामिळनाडूमध्ये गेले तर तामिळी बोलतात. येथे सुद्धा कामापुरते त्या लोकांनी मराठीत बोललं पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते बरोबर आहे. वाद करून काही मुद्दा मिटणार नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी चर्चा सुरू आहे. यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना लपून-छपून भेटण्याचं कारणच काय. कोणीही विरोधी पक्षातील नेता भेटू शकतो. अनेकवेळा लोकांचे कामं असतात, त्यासाठी भेटी होतात. हे नेते सार्वजनिक क्षेत्रातले नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत. पॉलिसी आहे काही काम असेल, अडचण असेल यासाठी मुख्यमंत्र्यांनाच भेटणारच ना. त्याच्यामध्ये लपून-छपून भेटायचे काय कारण ओपनली भेटतील. अशा रीतीने बातम्या पसरवण्याचे काही कारण नाही, असं यावेळी  भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?