AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमारांनी पूर्ण देशात गोंधळ घातलाय, त्यांनी… काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य, काय म्हणाल्या?

Yashomati Thakur Tweet News: SIR प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. निवडणूक आयोग व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे.

ज्ञानेश कुमारांनी पूर्ण देशात गोंधळ घातलाय, त्यांनी... काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य, काय म्हणाल्या?
| Updated on: Oct 09, 2026 | 7:39 PM
Share

विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेतील अनियमितता, मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गर्ल्स हायस्कूल चौकातून दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी निवडणूक आयोग आणि शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदींनी केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला.

त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले. यावेळी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, पात्र मतदारांची नावे तातडीने पुनर्नोंदणीत आणावीत, मतदारांना आक्षेप नोंदविण्याची पुरेशी संधी द्यावी तसेच मतदार यादीतील बदलांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, SIR आणि ‘वोट चोरी’ करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी इंडिया आघाडीने अमरावतीत भव्य मोर्चा काढला. यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, अमरावती यांची भेट घेतली. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण देशात गोंधळ निर्माण केला असून त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. तसेच देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सरकारकडून दिली जाणारी वागणूकही निषेधार्ह आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता व घटनात्मक स्वायत्तता सुनिश्चित करण्याबरोबरच नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठविल्याचा उल्लेख करत आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचीही इंडिया आघाडीने निषेध केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली. ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा’. SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारांच्या हक्कांचा प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा’, अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. मी राज्याची मंत्री, आमदार राहिलेली असताना माझ्या मुलांच्या मतदान ओळखपत्रात त्रुटी काढण्यात आली. मग सर्वसामान्यांचं काय? त्यामुळे मूळ मुद्दा हा SIR आणि वोट चोरीचा आहे. भाजपने ऍप तयार करून त्याचा एक्सेस तहसीलदार आणि इतरांना देण्यात आला आहे. कोणती नावं डिलिट करावीत हे ठरवलं जात आहे. ज्ञानेश कुमार यांनी पूर्ण देशात गोंधळ घातलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जात आहे. तीही निषेधार्ह आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...