AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, बड्या नेत्यांना तातडीने बोलवले नागपुरात

Lok Sabha Election Maharashtra Politics: काँग्रेस नेते विशाल पाटील मंगळवारी सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. सांगलीत महाविकास आघाडी म्हणजेच उबाठा शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील रिंगणात उतरले आहे.

काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, बड्या नेत्यांना तातडीने बोलवले नागपुरात
congress
| Updated on: Apr 15, 2024 | 12:13 PM
Share

महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर झाले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना सर्वाधिक २१ जागा लढवणार आहे. काँग्रेस १७ उमेदवार देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागा लढवणार आहेत. या जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मुंबईत जागा न मिळाल्याने माजी मंत्री वर्षा गायकवाड नाराज आहेत. यासंदर्भातील नाराजी त्यांनी जाहीरपणे मांडली होती. तसेच सांगलीमधील जागा काँग्रेसला मिळाली नाही. या जागेवर उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपापूर्वीच उमेदवार जाहीर केला होता. ती जागा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिली. त्यावरुन काँग्रेस नेते विशाल पाटील नाराज झाले असून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी चालवली आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक नागपुरात बोलवण्यात आली आहे.

सांगलीतील तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला नागपुरात दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्यात आली. त्यासाठी आमदार विश्वजीत कदम आणि आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांना तातडीने नागपूरकडे येण्याचे निरोप देण्यात आला आहे. सोमवारी रात्री 9 वाजता नागपूरमध्ये बैठक होणार आहे. त्यासाठी त्यांना बोलवले आहे. या बैठकीत काँग्रेस नेते चेन्निथलासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थिती राहणार आहे.

विशाल पाटील अर्ज दाखल करणार

काँग्रेस नेते विशाल पाटील मंगळवारी सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. सांगलीत महाविकास आघाडी म्हणजेच उबाठा शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील रिंगणात उतरले आहे. भाजप उमेदवार संजय काका पाटील निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे सांगतील लढत तिरंगी होणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत येणार आहे.

चंद्रहार पाटील 19 एप्रिल रोजी अर्ज भरणार

शिवसेना महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गट सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली.

सांगलीत मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

सांगलीतील आज पार पाडणाऱ्या महाविकास आघाडी मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रावर पाटील यांच्या प्रचारार्थ हा मेळावा होत आहे. या मेळाव्याचे निमंत्रण विश्वजीत कदम यांना देण्यात आला आहे. मात्र मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी जाहीर केली आहे. विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा होती. परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.