अखेर काँग्रेसने संजय निरुपम यांना बाहेरचा रस्ता दाखवलाच, पक्षाची मोठी कारवाई

काँग्रेस हायकमांडने संजय निरुपम यांची पुढच्या 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये संजय निरुपम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अखेर काँग्रेसने संजय निरुपम यांना बाहेरचा रस्ता दाखवलाच, पक्षाची मोठी कारवाई
काँग्रेस नेते संजय निरुपम
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 11:40 PM

काँग्रेस पक्षाकडून अखेर माजी खासदार संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने संजय निरुपम यांची पुढच्या 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये संजय निरुपम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पक्षशिस्तीचं पालन न करणं आणि पक्षाविरोधात वक्तव्ये करणे यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी संजय निरुपम यांच्यावरील निलंबणाच्या कारवाईचा प्रस्ताव मान्य केला आहे. निरुपम यांना आजपासून तातडीने पुढच्या 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Image

संजय निरुपम हे काँग्रेसचे मुंबईतील आक्रमक नेत्यांपैकी एक नेते आहेत. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. संजय निरुपम एकेकाळी शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी बरेच वर्ष काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केलं आहे. त्याची जाणीव काँग्रेस पक्षालाही होती. काँग्रेसच्या स्टार प्रचारक नेत्यांच्या यादीत ते होते. पण उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय निरुपम यांनी खूप आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

संजय निरुमप यांचा पक्षाला इशारा

ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यांच्या उमेदवारीला संजय निरुपम यांनी विरोध केला होता. याउलट त्यांनी त्या मतदारसंघावर दावा केला होता. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आपल्या पक्षाला आठवड्याची मुदत दिली होती. पक्षाने आपल्या मागणीचा विचार केला नाही तर आपण वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याचा उद्या शेवटचा दिवस होता. पण त्याआधीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

निरुपम शिंदे गटात जाणार?

काँग्रेसची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीतच संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव दिल्लीत हायकमांडला पाठवण्यात आला होता. यानंतर संजय निरुपम यांनी ट्वीट करत आपण उद्या आपला निर्णय घोषित करणार, असं जाहीर केलं. यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर अधिकृत निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निरुपम शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा आहे. याबाबत उद्या मोठा खुलासा होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.