AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंना मविआत एन्ट्री? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं..

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरेंना मविआत एन्ट्री? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं..
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 2:52 PM
Share

आता पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एका मुलाखतीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता, भविष्यात तुमची उद्धव ठाकरेंसोबत युती होऊ शकते का? त्यावर बोलताना  “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्याला आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? 

महाराष्ट्र राज्यापेक्षा आम्ही मोठे नाही याचा अर्थ भाजप राज्याचं नुकसान करत आहे हे स्पष्ट आहे. राज्यातून अनेक उद्योग बाहेर जात आहेत, भाजप नुकसान करत आहे. महायुती राज्याच्या मुळावर उठली आहे, असा त्यामागचा अर्थ आहे. भाजप महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे, भाजप महाराष्ट्राला संस्कृती आणि भाषेपासून तोडत आहे, राज ठाकरेंची भूमिका म्हणजे इशारा आहे. राज ठाकरे यांचा भाजपने भ्रमनिरास केला आहे. दोन परिवार एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू, आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला तर विचार करू, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

त्यांची भूमिका काँग्रेसला पूरक आहे. हिंदी भाषा सक्तीच्या आम्ही देखील विरोधात आहोत.   मराठी भाषेची गळचेपी होत आहे. हिंदी भाषा सक्तीची का केली जात आहे? हे सगळं भाजपचं कारस्थान आहे . भाजप द्वेष पसरवत आहे. हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असे भाजपला करायचं आहे, असा आरोपही यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी