AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole: विजेचे संकट ते तपास यंत्रणांचा गैरवापर; पवार- नाना पटोले भेटीत नेमकी चर्चा काय?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

Nana Patole: विजेचे संकट ते तपास यंत्रणांचा गैरवापर; पवार- नाना पटोले भेटीत नेमकी चर्चा काय?
पवार- नाना पटोले भेटीत नेमकी चर्चा काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2022 | 4:21 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यावर विजेचे संकट ओढवले असून केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पुरेसा कोळसा पुरवठा केला जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर कारवाया केल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सेव्ह विक्रांतवरून किरीट सोमय्या यांना धारेवर धरले.

खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात विजेची मागणी वाढलेली असताना केंद्र सरकारकडून राज्याला पुरेसा कोळशा पुरवठा केला जात नाही. परिणामी राज्यावर लोडशेडींग करण्याची वेळ आली आहे. हा विषय तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या अडवणुकीमुळे राज्य अंधारात जाण्याचा धोका आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने राजकीय सूडबुद्धीतून कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार दबाव बनवून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण केंद्र सरकारची ही मनमानी जास्त दिवस चालणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

एवढा आकांडतांडव का करता?

केंद्रीय तपास यंत्रणामार्फत जेव्हा मविआ नेत्यांवर कारवाई केली जाते तेव्हा ‘कर नाही तर डर कशाला?’ असे म्हणणारे भाजपा नेते प्रविण दरेकर व इतर भाजपा नेत्यांवर राज्यातील यंत्रणा कारवाई करतात तेव्हा आकांडतांडव का करतात? असा सवाल पटोले यांनी केला. आजच्या भेटीत केंद्र सरकारकडून राज्याला दिली जात असलेली सापत्नभावाची वागणूक व राज्याला भेडसावणाऱ्या महत्वाच्या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. या सर्व विषयांवर दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

त्या पैशाचं काय झालं?

आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी ‘सेव्ह विक्रांत’ अभियान राबवण्यात आले होते. यावेळी जमा केलेला पैसा कुठे गेला हा प्रश्न विचारला जात आहे, तो रास्तच आहे. तो पैसा राजभवनला पाठवल्याचे सांगितले जात होते. पण राजभवननेच असा कोणताही निधी मिळाला नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा पैसा कुठे गेला याचे उत्तर भाजपाने जनतेला दिले पाहिजे. परंतु भाजपा जाणीवपूर्वक विषयाला बगल देत आहे. विक्रांतसाठी जमा केलेला पैशाचा व्यवहार कोणत्या बँकेतून झाला हे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे, या सर्वांचा खुलासा करून त्या पैशाचे काय झाले समजले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

St Worker : शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार

MSRTC: आमच्या शोषणाला फक्त आणि फक्त शरद पवारच जबाबदार, 12 एप्रिलला बारामतीत आंदोलन करणार; एसटी कर्मचारी संतापले

Sharad Pawar Narendra Modi Meet: चंद्रकांत पाटलांची मतदारांना ईडीची धमकी, मोदींकडे तक्रार केलीय का?; शरद पवार म्हणतात…

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.