कोरोनाने घेरले, नागपूर आज आणि रविवारी बंद; मिनी लॉकडाऊनही सुरू

कोरोनाचा कहर वाढल्याने आज आणि उद्या रविवारी नागपूर बंद ठेवण्यात येणार आहे. (corona cases increase: nagpur bandh for two days)

कोरोनाने घेरले, नागपूर आज आणि रविवारी बंद; मिनी लॉकडाऊनही सुरू
नागपूर बंद
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 7:35 AM

नागपूर: कोरोनाचा कहर वाढल्याने आज आणि उद्या रविवारी नागपूर बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, मंगलकार्यालये, प्रतिष्ठाने, सिनेनागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे आणि मॉलही बंद राहणार आहेत. प्रशासनाने त्याबाबतची माहिती दिली आहे. (corona cases increase: nagpur bandh for two days)

नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1393 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात आज आणि उद्या मिनी लॅाकडाऊन करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवस जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात येणार आहेत. फक्त चिकन, मटन शॉप, भाजीपाला, दूध विक्रीसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, मंगलकार्यालये, प्रतिष्ठाने, सिनेनागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, मॉल, – शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार बंद राहणार आहेत. जिल्ह्यात येत्या 14 मार्चपर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विवाह सोहळ्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच आदेशच नागपूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.

लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी शहरात तसेच ग्रामीण भागात केंद्रांची संख्या वाढवतानाच प्रत्येक केंद्रावर बसण्याची सुविधा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची सूचना करताना डॉ. संजीव कुमार यांनी केली.

प्रत्येक लसीकरण केंद्रावर मार्गदर्शन व सुविधा केंद्रही सुरू

जिल्ह्यात सहा लाख नागरिकांचे लसीकरण करणे अपेक्षित आहे त्यादृष्टीने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करुन दररोज 10 ते 15 हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल यादृष्टीने नियोजन करावे. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक केंद्रावर मार्गदर्शन व सुविधा केंद्रही सुरू करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.

11 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा

नागपूर शहर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स यासह 11 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात शासकीय ग्रामीण रुग्णालय व सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय व सुविधा केंद्रावर जनतेचा विश्वास असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी होत असल्यामुळे या सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. (corona cases increase: nagpur bandh for two days)

संबंधित बातम्या:

नागपुरात वाढता कोरोना, गर्दी टाळण्यासाठी विभागीय आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

‘अकोला जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवा नाहीतर रस्त्यावर उतरु’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

 आता कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहताना RTPCR चाचणी गरजेची! वर्धा जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

(corona cases increase: nagpur bandh for two days)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.