सोलापुरात कोरोनाचा शिरकाव, मृत्यू झालेल्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सोलापुरात एका मृत व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या मृत व्यक्तीचं सोलापुरात किराण्याचं दुकान होतं (Corona enter in Solapur).

सोलापुरात कोरोनाचा शिरकाव,  मृत्यू झालेल्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 8:58 PM

सोलापूर : जगभरात थैमान घालणारा कोरोना आता सोलापूर जिल्ह्यातही धडकला आहे (Corona enter in Solapur). सोलापुरात एका मृत व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या मृत व्यक्तीचं सोलापुरात किराण्याचं दुकान होतं. तो 10 एप्रिल रोजी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र, उपचारादरम्यान 11 एप्रिल रोजी सकाळी 1 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला (Corona enter in Solapur).

या मृत व्यक्तीच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज आला. त्यामध्ये या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती समोर आली. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. या मृत व्यक्तीचं किराणा दुकान जोडबसवण्णा चौकाजवळ होतं. त्यामुळे हा चौक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पुढच्या 14 दिवसांसाठी पूर्णता सील करण्यात आला आहे.

कोरोनाबाधित ही मृत व्यक्ती किती लोकांच्या संपर्कात आली याचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी सोलापूर महापालिका आणि पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. मृत व्यक्ती राहत असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या भागात सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी मास्क वापरावं, घरातून बाहेर न पडावं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, असं आवाहनही मिलिंद शंभरकर यांनी केलं.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर

कोरोनाचा प्रादूर्भाव महाराष्ट्रात वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1982 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात आज दिवसभरात 121 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 217 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 8,356 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 909 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

संबंधित बातम्या :

भारतात ‘कोरोना’ग्रस्त तुलनेने कमी, मात्र फैलाव दर वाढता, ‘कोरोना’ कसा पसरतोय?

कोरोनाचा कहर, देशात 24 तासात 909 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 8,356 वर

नागपुरात कोरोनाचे 14 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 41 वर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.