राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोना, 93 पोलिसांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत पोलीस दलातील 8232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली (Maharashtra Police Corona Positive) आहे.

राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोना, 93 पोलिसांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आतापर्यंत पोलीस दलातील 8232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली (Maharashtra Police Corona Positive) आहे. यामध्ये 861 पोलीस अधिकारी तर 7371 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे 93 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 अधिकारी आणि 86 पोलीस कर्मचारी यांचा समावेश (Maharashtra Police Corona Positive) आहे.

कोरोनातून 6314 पोलीस बरे झाले आहेत. यामध्ये 640 अधिकारी आणि 5674 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या 1825 पोलिसांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणं आहेत. यामध्ये 214 अधिकारी 1611 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दोन लाख सात हजार 543 लोकांवर गुन्हे दाखल

लॉकडाऊन काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोन लाख सात हजार 543 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात 31 हजार 671 नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

94 हजार 20 वाहने जप्त

94 हजार 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 317 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवरील हल्ल्यात 86 पोलीस जखमी झाले आहेत. तर पोलिसांवर हल्ले करणाऱ्या 881 लोकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दंडात्मक कारवाईत सुमारे 16 कोटी 87 लाख रुपये दंड वसूल केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीवर हल्ल्याच्या 55 घटना घडल्या असून त्याबाबत ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या : 

राज्यातील पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पोलिसांच्या दक्षतेसाठी गृह विभागाकडून नियमावली जारी

राज्यात आतापर्यंत कोरोनाने 85 पोलिसांचे निधन, 314 ठिकाणी पोलिसांवर हल्ले, 86 पोलीस जखमी

Published On - 1:03 pm, Sat, 25 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI