AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावातील कोरोनाचा विळखा घट्ट, आणखी 8 जण पॉझिटिव्ह, एकूण आकडा 126 वर

मुंबई-पुण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर देखील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनलं आहे (Corona infection cases increases in Malegaon).

मालेगावातील कोरोनाचा विळखा घट्ट, आणखी 8 जण पॉझिटिव्ह, एकूण आकडा 126 वर
| Updated on: Apr 25, 2020 | 5:29 PM
Share

नाशिक : मुंबई-पुण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर देखील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनलं आहे (Corona infection cases increases in Malegaon). दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज (25 एप्रिल) आणखी 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. यासह मालेगावात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 126 वर जाऊन पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 142 झाली आहे. या परिस्थितीमुळे शहरातील एकूण 14 परिसर कँटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हा सर्व भाग सील करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शहारत 4 एसआरपीएफच्या तुकड्या, 150 अधिकाऱ्यांसह सुमारे 1 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक वाहनं देखील जप्त करण्यात आली आहेत.

मालेगाव शहरतील हॉटस्पॉट

  • मोमीनपुरा
  • कमालपुरा,
  • नयापुरा
  • अक्स कॉलनी
  • गुलाब पार्क
  • मदिना बाग
  • नूर बाग
  • अपना सुपर मार्केट
  • हजार खोली
  • इस्लामाबाद
  • खुसमत पुरा
  • बेल बाग
  • मोतीपुरा
  • झाद नगर
  • दत्त नगर

दरम्यान, कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावातील बडा कब्रस्तानात गेल्या 8 दिवसांत सरासरीपेक्षा तिप्पट मृतदेह दफनविधीसाठी आले आहेत. या धक्कादायक माहितीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. इतर वेळी बडा कब्रस्तानात दररोज सरासरी 7 ते 8 मृतदेह अंत्यविधीसाठी येतात. मात्र, 15 एप्रिलपासून हे प्रमाण तिप्पट झाले आहे. 15 एप्रिलला एकाच दिवशी मालेगावात कोरोनाव्यतिरिक्त 24 मृत्यू झाले होते. या महिनाभरात कोरोनामुळे येथील 14 जणांचा मृत्यू झाला, तर इतर आजारांमुळे 221 जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव बडी कब्रस्तानातील नोंदींवरुन पुढे आले आहे.

कब्रीस्तानात दफनविधीसाठी झालेली वाढ

  • 1 एप्रिल 6 जणांचा मृत्यू
  • 2 एप्रिल 4 जणांचा मृत्यू
  • 3 एप्रिल 6 जणांचा मृत्यू
  • 4 एप्रिल 5 जणांचा मृत्यू
  • 5 एप्रिल 8 जणांचा मृत्यू
  • 6 एप्रिल 6 जणांचा मृत्यू
  • 7 एप्रिल 7 जणांचा मृत्यू
  • 8 एप्रिल 6 जणांचा मृत्यू
  • 9 एप्रिल 4 जणांचा मृत्यू
  • 10 एप्रिल 7 जणांचा मृत्यू
  • 11 एप्रिल 8 जणांचा मृत्यू
  • 12 एप्रिल 10 जणांचा मृत्यू
  • 13 एप्रिल 8 जणांचा मृत्यू
  • 14 एप्रिल 9 जणांचा मृत्यू
  • 15 एप्रिल 24 जणांचा मृत्यू
  • 16 एप्रिल 14 जणांचा मृत्यू
  • 17 एप्रिल 14 जणांचा मृत्यू
  • 18 एप्रिल 18 जणांचा मृत्यू
  • 19 एप्रिल 17 जणांचा मृत्यू
  • 20 एप्रिल 22 जणांचा मृत्यू
  • 21 एप्रिल 18 जणांचा मृत्यू

मालेगावमध्ये कोरोना रुग्ण वाढण्यामागे लॉकडाऊनच्या काळात मालेगावकारांनी दाखवलेला निष्काळजीपणा आणि प्रशासनाची उदासीनता ही कारणे असल्याचा आरोप होत आहे. संचारबंदीची जशी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, ती करण्यात आली नाही. परिणामी शहरातील अनेक भागात लोकांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मालेगावच्या ज्या भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, त्यात अनेक भाग हे झोपडपट्टी आहेत. तर काही भाग दाट लोकवस्ती असलेले आहेत. त्यात अधिक प्रमाणात यंत्रमाग कामगार राहतात, तर काही भाग हा चांगले सुशिक्षित, यंत्रमाग मालक नागरिक राहत असलेल्या भाग आहे.

मालेगाव हे यंत्रमाग कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. शहरात सुमारे 2 लाख यंत्रमाग असून तितकेच त्यावर कामकरणारे मजूर आहे. यंत्रमाग काम करणाऱ्या कामगारांमध्ये टीबीरोग जास्त प्रमाणात आढळतो धाग्याचे बारीक-बारीक कण नाका तोंडाद्वारे शरीरात जाऊन फुफ्फुसं निकामी करतात आणि कोरोना ही फुफ्फुसावर अटॅक करत असल्याने या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यासाठी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं मत डॉ . सईद फाराणी यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या :

Corona : मालेगाव ‘कोरोना’ हॉटस्पॉट कसं बनलं?

Malegaon corona | मालेगावातील बडा कब्रस्तानात दफनविधीसाठी आठ दिवसात तिप्पट मृतदेह

Corona infection cases increases in Malegaon

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.