पालघरचे 180 वऱ्हाडी डेस्टिनेशन वेडिंगसाठी विमानाने राजस्थानला, तिघांना कोरोना झाल्यानं यंत्रणा अलर्ट

पालघर येथून राजस्थानमधील जयपूर येथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी गेलेल्या 180 वऱ्हाडींपैकी 3 जण कोरोना बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली.

पालघरचे 180 वऱ्हाडी डेस्टिनेशन वेडिंगसाठी विमानाने राजस्थानला, तिघांना कोरोना झाल्यानं यंत्रणा अलर्ट
coronavirus
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 11:16 PM

पालघर : राज्यात सर्वत्र कोरोनाने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केलीय. त्यातच नागरिकांच्या सार्वजनिक कार्यक्रमाने आरोग्य यंत्रणांची तारेवरची कसरत सुरुये. असंच एक प्रकरण पालघरमध्ये पाहायला मिळालं. पालघर येथून राजस्थानमधील जयपूर येथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी गेलेल्या 180 वऱ्हाडींपैकी 3 जण कोरोना बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे या सर्वच्या सर्व 180 वऱ्हाड्यांना तहसलिदारांनी तात्काळ कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिलेत (Corona infection to Palghar people who attend destination wedding in Rajasthan).

लग्न समारंभासाठी गेलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यानंतर कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जातेय. विशेष म्हणजे कोरोना लागण झालेल्या 3 व्यक्तींमध्ये दोघे नगरसेवक आहेत, तर एक विधी तज्ज्ञ नसून प्रतिष्ठित व्यक्ती आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये दिग्गजांचा समावेश असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत.

‘बड्या बांधकाम विकासकाच्या मुलाचं डेस्टिनेशन वेडिंग’

पालघरमधील एका बड्या बांधकाम विकासकाच्या मुलाचं डेस्टिनेशन वेडिंग होतं. त्या लग्नासाठी पालघरहून 180 वऱ्हाडी जयपूर येथे गेले. यानंतर ते पुन्हा लग्न करुन पालघरमध्ये परतले. मात्र, त्या वऱ्हाडींपैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यात पालघर नगरपरिषदेचे 2 नगरसेवक तर एक विधी तज्ज्ञ नसून प्रतिष्ठित व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. जयपूर येथे गेलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींची कोरोना तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सुनील शिंदे यांनी वर पित्याला दिले आहेत.

लग्न समारंभासाठी खासगी विमान

पालघरहून राजस्थान जयपूर येथे सुमारे 180 वऱ्हाडी एका खासगी विमानाने लग्न समारंभासाठी गेले होते. तेथे हे सर्व एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. विवाह समारंभात या सर्वांनी एकत्र वास्तव्य आणि वावर केला होता. त्यानंतर 10 मार्च रोजी ते पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं.

सर्व वऱ्हाडींची 14 व 15 मार्च रोजी कोरोनाची तपासणी

वऱ्हाड्यांपैकी काही जण कोरोनाग्रस्त निघाल्याने प्रशासन खडबडून जागं झाला. कोरोना झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना देखील बाधा होण्याची दाट शक्यता लक्षात घेत तात्काळ सर्व वऱ्हाडींना 14 व 15 मार्च रोजी पालघर ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची तपासणी करून घेण्याबाबत सूचित केले. कोरोना टेस्टिंग केली नसल्यास निदर्शनास आल्यास आपल्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचाही दम तहसीलदार यांनी दिलाय. मोठी बाब म्हणजे या लग्न समारंभात 7 नगरसेवकांचा समावेश असल्याचा बोललं जात आहे.

हेही वाचा :

पालघरच्या आश्रमशाळेत कोरोनाचा स्फोट, 48 विद्यार्थ्यांपाठोपाठ 19 कर्मचारीही बाधित

पालघरला कोरोनाचा विळखा, आश्रमशाळेतील 37 विद्यार्थ्यांना लागण

Palghar Bird Flu | पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, चिकन विक्रीची दुकानं, पोल्ट्रीफार्म 21 दिवस बंद ठेवण्याचे आदेश

व्हिडीओ पाहा :

Corona infection to Palghar people who attend destination wedding in Rajasthan

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.