पालघरच्या आश्रमशाळेत कोरोनाचा स्फोट, 48 विद्यार्थ्यांपाठोपाठ 19 कर्मचारीही बाधित

पालघर तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना आहेत. (Palghar Corona Update)

पालघरच्या आश्रमशाळेत कोरोनाचा स्फोट, 48 विद्यार्थ्यांपाठोपाठ 19 कर्मचारीही बाधित
corona virus news

पालघर : पालघर तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना आहेत. पालघरमधील आश्रमशाळेत जेवण पुरवणाऱ्या 19 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या ते किचन बंद करण्यात आले आहे. यामुळे पालघरमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. (Palghar Corona Update 48 School Student tested positive)

दोन दिवसात 86 जणांना कोरोना

पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरपरिषद क्षेत्रातील जव्हार तालुक्यात एक आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये जेवण पुरवणांऱ्याना विनवळ सेंट्रल नावाची एक किचन आहे. या किचनमधील 19 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सध्या हे किचन बंद करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आश्रमशाळेत 48 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जव्हार तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 86 पर्यंत पोहोचली आहे.

उपचार सुरु

दरम्यान या ठिकाणी सर्दी, ताप अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना विक्रमगड येथील रिव्हेरा कोव्हिड केंद्रात हलवण्यात आले आहे. तर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जव्हारच्या मुलीच्या वसतिगृह येथील सीसीसी केंद्रात दाखल करण्यात आले आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता खेड्यातील आठवडे बाजार काही दिवसांसाठी बंद ठेवली जाणार आहे.

पालघरमध्ये गेल्या दोन दिवसात 86 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या सर्वांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जव्हार तालुका आरोग्य कर्मचारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

पालघरमध्ये 896 कोरोना रुग्ण

पालघरमध्ये काल दिवसभरात 23 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पालघरमध्ये एकूण 49 हजार 687 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 47 हजार 842 रुग्ण बरे झाले आहेत. यातील 939 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पालघरमध्ये 896 कोरोना रुग्ण आहेत. (Palghar Corona Update 48 School Student tested positive)

लातूरमध्ये 40 विद्यार्थ्यांना कोरोना

दरम्यान लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या वसतिगृहातील शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. 40 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्याने 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत.

लातूरच्या एमआयडीसी भागात एक सीबीएसई स्कूल आहे. या स्कूलच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीमध्ये कोरोनाची पहिल्यांदा लक्षणे आढळली. त्या नंतर इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.

राज्यातील कोरोना स्थिती काय? 

राज्यात काल (12 मार्च) 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 82 हजार 191 इतकी झाली आहे. तर राज्यात आज 56 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.31 % एवढा आहे.

राज्यात काल 11,344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण 21,17,744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.79% एवढे झाले आहे. (Palghar Corona Update 48 School Student tested positive)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown update | परभणी, मिरा-भाईंदरसह नागपुरात लॉकडाऊन, पुणे- मुंबईसह राज्याची स्थिती काय?

Aurangabad Lockdown | औरंगाबादेत कडकडीत बंद, काय सुरु, काय बंद?

Published On - 11:58 am, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI