सांगलीतील स्मशानभूमीत कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले

सांगलीमध्ये मिरज पंढरपूर रस्त्यावर महापालिकेच्या स्मशानभूमीत कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला (Sangli Corona Patient Death) आहे.

सांगलीतील स्मशानभूमीत कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले

सांगली : सांगलीमध्ये मिरज पंढरपूर रस्त्यावर महापालिकेच्या स्मशानभूमीत कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला (Sangli Corona Patient Death) आहे. मृतदेह आसपासच्या भटक्या कुत्र्यांनी शेजारच्या शेतामध्ये नेऊन टाकला आणि कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले आहेत. या घडलेल्या प्रकरणामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे (Sangli Corona Patient Death).

गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. स्मशानभूमी शेजारचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

गावातील घाट रोडवर डिझेल वाहिनी आहे. मात्र ती डिझेल वाहिनी एक वर्षं बंद आहे. ती सुरू करून तिथं अंत्यसंस्कार सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सध्या मिरज पंढरपूर रस्त्यावरील ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात, ती नागरीवस्तीत आहे. तिथल्या धुरामुळे त्रास होतो, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. शिवाय इथं अपुरी कर्मचारी संख्या आहे आणि एकावेळी अनेक मृतदेह तिथे येतात त्यामुळे कर्मचारी जीवधोक्यात घालून अंत्यसंस्कारचे काम करत आहेत, असं ग्रामस्थांनी सांगितले.

“या घटनेनेची दखल घेतली असून स्मशानभूमीला जाळी लावून बंधीस्त केले जाईल. शिवाय घाट रोडवरील डिझेल वाहिनी सुरू करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे”, असं सांगलीचे आरोग्यधिकारी डॉ. रवी ताटे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Kolhapur Corona| कोल्हापुरात कोरोनाबाधिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला नातेवाईकांचा नकार

Thane Corona | कोरोनाबाधितांच्या मृतदेहांची अदलाबदल, ठाण्यातील ग्लोबल हब रुग्णालयाचा भोंगळ कारभार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *