कोव्हिड सेंटरमधून रुग्ण बेपत्ता, नगरपालिकेसमोर रस्त्यावर मृतदेह सापडला, जळगावातील धक्कादायक घटना

अमळनेर तालुक्यात ही घटना घडल्याने माजी आमदार स्मिता वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल (Corona Patient dead body found near Municipality road) केली.

कोव्हिड सेंटरमधून रुग्ण बेपत्ता, नगरपालिकेसमोर रस्त्यावर मृतदेह सापडला, जळगावातील धक्कादायक घटना

जळगाव : अमळनेरमधील कोरोना सेंटरमधून एक रुग्ण बेपत्ता झाला होता. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृतदेह नगरपालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळून आल्याने खळबळ उ़डाली आहे. अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतची दखल घेत अहवाल मागवला आहे. (Corona Patient dead body found near Municipality road)

अमळनेरमधील वावडे येथे राहणारा सुनील दिलभर पाटील (34) याने आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या शिबीरात स्वॅब टेस्ट केली होती. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रविवारी (9 ऑगस्ट) त्याला प्रताप महाविद्यालयातील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याला थोडा त्रास आणि हाताला जखम झाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी़ त्याला ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या कक्षात उपचारासाठी पाठवले.

ग्रामीण रुग्णालयातील कोरोना कक्षात 20 रुग्णांची क्षमता आहे. मात्र तरीही या ठिकाणी 40 जणांवर उपचार सुरु होते. त्यामुळे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडत होती. त्यात काल सकाळी सुनील पाटील हा कोरोनाबाधित रुग्ण त्या ठिकाणी दिसला नाही. त्यामुळे डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी शोधाशोध सुरु केली.

हेही वाचा – कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही : मुख्यमंत्री

त्याच्या जवळचे नातेवाईक किंवा फोन नंबर अशी कोणतीही नोंद नसल्याने त्याला शोधण्यास अडचण येत होती. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रकाश ताडे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.

मात्र संध्याकाळी पाचच्या सुमारास सुनीलचा मृतदेह सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नागरपालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्यांनतर रुग्णवाहिकेने त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला. तसेच ती जागा सॅनिटाईज करण्यात आली.

दरम्यान यापूर्वी बापू निंबा वाणी हा संशयित रुग्ण प्रताप महाविद्यालयातील क्वारंटाईन कक्षातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर पारोळा तालुक्यात महामार्गावर झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. जळगावनंतर अमळनेर तालुक्यात दुसरी घटना घडल्याने माजी आमदार स्मिता वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तसेच यापूर्वी आधीच्या प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचेही नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घातले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाला आहे का याबाबत चौकशी करून अहवाल मागवला आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात बंदोबस्ताला असलेले पोलीस अधून मधून गायब झालेले असतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. (Corona Patient dead body found near Municipality road)

संबंधित बातम्या : 

‘कोरोना’वर लस शोधण्यात रशियाची आघाडी, पुतीन यांची घोषणा

10 राज्यात 80% कोरोना रुग्ण, मोदींचा 10 मुख्यमंत्र्यांना सल्ला, 72 तासांच्या प्लॅनिंगवर भर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *